उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरची सानिया मिर्झा देशाची पहिली मुस्लिम महिला फायटर पायलट बनणार आहे. सानिया NDA अर्थात नॅशनल डिफेन्स अकादमीची परीक्षा 149 व्या रँकने पास झाली आहे. ती यूपीची पहिली महिला फायटर पायलटही ठरेल. 27 डिसेंबर रोजी पुण्यातील प्रशिक्षणाला सुरुवात करून ती आपले स्वप्न साकार करण्यासाठी गरूड झेप घेईल.
सानिया मिर्झापूरपासून 10 किमी अंतरावर असणाऱ्या जसोवर गावची आहे. गावातीलच शाळेत तिे 10वीपर्यंतचे शिक्षम घेतले. 12 वीसाठी ती मिर्झापूरला आली. तिने हिंदी मेडियममध्ये शिक्षण घेतले. सानियाचे वडील शाहिद अली टीव्ही मेकॅनिक आहेत. गावातील घरातच त्यांचे दुकान आहे. एनडीएचा रिझल्ट येताच सानिया देशभरात चर्चेचा विषय ठरली.
चला सानियाच्या संघर्षाची कथा तिच्याच शब्दांत वाचा…

NDAत निवड झाल्यामुळे सानिया खूप आनंदात आहे. ती म्हणते, “मी देशाची पहिली महिला पायलट अवनी चतुर्वेदीची मुलाखत वाचली होती. तेव्हापासून माझ्या मनात फायटर पायलट बनण्याची इच्छा निर्माण झाली होती. सामान्यतः आम्ही ज्या ठिकाणाहून येतो, तिथे शिक्षक, डॉक्टर किंवा इंजिनीअर बनण्याच्या पुढे काहीतरी बनण्याचा कोणताही विचार होत नाही. माझे शिक्षण हिंदीत झाले. 8वीपर्यंत गावातीलच सरकारी शाळेत शिकले. त्यानंतर 10 वी शिक्षणही गावातच घेतले.
गावात चांगली शाळा नाही. त्यामुळे मला मिर्झापूरच्या गुरु नानक गर्ल्स इंटर कॉलेजमध्ये टाकण्यात आले. तिते मी 12वीपर्यंत शिकले. 12वी बोर्डात मी जिल्ह्यात अव्वल आले. मला फायटर पायलट बनण्याची ओढ लागली होती. त्यामुळे मी 12 वीनंतर मिर्झापूरच्या कोचिंगमध्येच एनडीएची तयारी सुरू केली.
वडील TV मेकॅनिक, म्हणाले -मुलीचा अभिमान
सानियाचे वडील शाहिद अली टीव्ही मेकॅनिक आहेत. ते म्हणतात, “सानिया देशाची पहिली फायटर पायलट अवनीला आदर्श मानते. तिला तिच्यासारखे व्हायचे आहे. फायटर पायलट म्हणून निवड होणारी सानिया देशाची दुसरी मुलगी आहे. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी केवळ तिची इच्छा पूर्ण करण्यास मदत केली.”
हा माझा एनडीएचा दुसरा प्रयत्न होता. पहिल्या प्रयत्नात माझी निवड झाली नाही. यामुळे थोडी निराश झाले. पण त्याचा त्रास करून घेतला नाही. मी माझे कमकूवत दुवे ओळखून त्यावर काम केले. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नांत माझी निवड जाली. एकेदिवशी माझी निवड झाल्याचे पत्र आले. मला 149 वी रँक मिळाली. पुण्यात 27 डिसेंबरपासून माझी ट्रेनिंग सुरू होईल.
मी तयारी करत होते तेव्हा लोकांनी हिंदी-इंग्रजी मेडियम म्हणून मला भीती घातली. म्हणाले – फोर्समध्ये इंग्रजी चालते. पण मला कोणतीच अडचण आली नाही. मी हिंदीतूनच शिक्षण घेतले. विज्ञानात मला जास्त रस आहे. लहानपणापासूनच मला अभियंता व्हायचे होते. देशाची पहिली महिला फायटर पायलट अवनी चतुर्वेदीला मी माझा प्रेरणास्त्रोत मानते. मला त्यांच्यापासून प्रेरणा मिळाली.
मुली ज्या क्षेत्रात जास्त जात नाहीत, तिकडे जाण्याचा चंग बांधला. अखेर मी एनडीएच्या परीक्षेची तयारी केली.
प्रत्येक मुलीने शिकावे अशी माझी इच्छा आहे. आमच्या समाजातील मुलींचे आई-वडील आपला सर्व पैसा मुलीच्या हुंड्यासाठी लावतात. खूप कमी मुली पुढे चालून बीए-बीएससी करतात. मी पायलट बनण्यात माझ्या पालकांचे खूप मोठे योगदान आहे. वडील जास्त सपोर्टिव्ह आहेत. त्यांनी माझ्यावर कोणताही दबाव येवू दिला नाही.