प्रा. माधव शेटकार यांना पीएच.डी. प्रदान
निलंगा : – महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी, निलंगा येथील प्रा. माधव अरविंद शेटकार यांना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नांदेड च्या वतीने फार्मसी शाखेत नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान केली आहे. प्रा. माधव अरविंद शेटकार यांनी महाराष्ट्र फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर एस. एस. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली “फार्मोलिशन अँड इव्होल्युशन ऑफ नॅनो पर्टिक्युलेट टॉपिकल ड्रग डिलिव्हरी सिस्टीम कंटेनिंग नॉनस्टरायडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग'” या विषयावर संशोधन प्रबंध नांदेड विद्यापीठाकडे सादर केला होता. प्रा.शेटकार यांच्या संशोधन प्रबंधास विद्यापीठाने मान्यता देत त्यांना पीएचडी पदवी देवून सन्मान करण्यात आला. याबद्दल महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी प्रा. डॉ. माधव शेटकार यांचा सत्कार केला. याप्रसंगी महाराष्ट्र कॉलेज ऑफ फार्मसी चे प्राचार्य. डॉ. एस. एस. पाटील व महाराष्ट्र पॉलिटेक्निक (डी. फार्म) इन्स्टिट्यूट निलंगाचे प्राचार्य डॉ. बी. एन. पौळ व सर्व प्राध्यापक वर्ग आदी उपस्थित होते.