महाराष्ट्र महाविद्यालयात डॉ.शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिर संपन्न
महाराष्ट्र महाविद्यालय, निलंगा येथील राष्ट्रीय सेवा योजना विभाग,राष्ट्रीय छात्र सेना विभाग व डॉ.भालचंद्र ब्लड सेंटर लातूर यांच्या वतीने कर्मयोगी डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यात एकूण 21 रक्तदात्यांनी रक्तदान केले.या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष श्री विजय पाटील निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले तर प्रमुख पाहुणे म्हणून निलंगा पोलीस स्टेशनच्या पोलीस उप निरीक्षक माने अनुसया या उपस्थित होत्या. प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव बब्रुवान सरतापे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कर्मवीर कदम,
उपप्राचार्य डॉ.बी एस गायकवाड, उपप्राचार्य पी पी गायकवाड, माजी प्राचार्य डॉ एम एन कोलपुके राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ व्हि पी सांडूर, प्रा.एस एस बदनाळे,प्रा श्रीकृष्ण दिवे,53 महा. बटा . एन सी सी लातूर संलग्नित महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख डॉ. सचिन बसुदे डॉ. भालचंद्र ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी श्री दिगंबर पवार सर व त्यांचे सहकारी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
