निलंग्यात काँग्रेस भवन मध्ये स्व. डॉ निलंगेकरांना अभिवादन
निलंगा : माजी मुख्यमंत्री स्व डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील काँग्रेस भवन कार्यालयात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. मंगळवार (दि ५) रोजी माजी मुख्यमंत्री स्व डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर यांची पुण्यतिथी निलंगा शहरात विविध ठिकाणी साजरी करण्यात आली. निलंगा विधानसभा काँंग्रेस कमिटीच्या वतीने निलंगा शहरातील काँग्रेस भवन कार्यालयात पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिवादन करण्यासाठी जेव्हा नेते विजयकुमार पाटील, जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील, माजी प.स.सभापती अजित माने, अजित निंबाळकर, शहराध्यक्ष अजित नाईकवाडे, तालुका कार्याध्यक्ष अॅड नारायण सोमवंशी, आंबादास जाधव, पंकज शेळके, शकील पटेल, सिराज देशमुख, गोविंद सुर्यवंशी, गिरीश पात्रे, तुराब बागवान, चेअरमन गंगाधर चव्हाण, साजन शिंदे, अपराजित मरगणे, मालबा घोणसे आदी उपस्थित होते..
