काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा रोखण्यास नकार दिला आहे. ते म्हणाले – केंद्र सरकारने आता नवा फॉर्म्युला काढला आहे. मला पत्र पाठवले आहे. त्यात मास्क घाला, कोविड पसरतोय असे सांगण्यात आले आहे. हे सर्व यात्रा रोखण्याचे बहाणे आहेत. भारताच्या वस्तुस्थितीला हे लोक घाबरलेत. आमची यात्रा काश्मीरपर्यंत जाईल.
उल्लेखनीय बाब म्हणजे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी राहुल गांधी यांना पत्र लिहून भारत जोडो यात्रा रोखण्याचे आवाहन केले होते. ते म्हणाले होते – देशात पुन्हा एकदा कोरोनाचे संकट वाढत आहे. आरोग्य आणीबाणीची स्थिती उद्भवल्यामुळे देश वाचवण्यासाठी भारत जोडो यात्रा थांबवण्याची गरज आहे.
राहुल गांधींचा 106 दिवसांपासून पायी प्रवास, पायाला पट्टी बांधली
काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या राजस्थानातून हरियाणात पोहोचली आहे. राज्यातील यात्रेचा आजचा दुसरा दिवस आहे. राहुल गांधी नूंहच्या ऐतिहासिक गांधीग्राम (घासेरा) पोहोचले. तिथे त्यांच्या पायाला पट्टी बांधल्याचे दिसून आले. राहुल मागील 106 दिवसांपासून पायी प्रवास करत आहेत. घासेरा गावच्या ग्रामस्थांनी मेवाती पगडी घालून त्यांचे स्वागत केले.
काँग्रेसचा आरोप यात्रेमुळे वीज पुरवठा खंडीत
दुसरीकडे, काँग्रेसने हरियाणातील मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्या नेतृत्वातील भाजप-जजपा सरकारने वीज पुरवठा खंडीत करण्याचा आरोप केला आहे. काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, 105 व्या दिवशी भडास नगिनात यात्रा संपली. तेथील ग्रामस्थांनी आज सकाळपासूनच वीज खंडीत झाल्याचे सांगितले. ही सामान्य गोष्ट नाही. काल, परवा किंवा मागील आठवडाभरात वीज पुरवठा खंडीत झाला नाही. भाजपचा डर्टी ट्रिक डिपार्टमेंट हरियाणात जास्त कष्ट करत आहे.
जयराम रमेश म्हणाले – रुग्ण जुलै, सप्टेंबर, नोव्हेंबरमध्ये आढळले, PM आज आढावा घेत आहेत
भारत जोडो यात्रा रोखण्याप्रकरणी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी लिहिलेल्या पत्रावर काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. काँग्रेस प्रवक्ते जयराम रमेश म्हणाले की, जुलै, सप्टेंबर व नोव्हेंबर महिन्यात गुजरात व ओडिशात ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट BF.7 चे 4 रुग्ण आढळले. भारत जोडो एका दिवसानंतर दिल्लीत प्रवेश करेल. आता तुम्ही क्रोनोलॉजी समजून घ्या.