• Fri. Oct 17th, 2025

मानवाने बाह्य अंगाने नव्हे तर मनाने निर्मळ असायला हवे- भंते सुमेधजी नागसेन

Byjantaadmin

Jul 27, 2025

माणवा ने बाह्य अंगाने नव्हे तर मनाने निर्मळ असायला हवे- भंते सुमेधजी नागसेन

निलंगा :- मानवाने  बाह्यअंगाने नव्हे तर मनाने निर्मळ असण्याची आज गरज आहे.आपल्या कर्मा मुळेच चांगले  अथवा वाईट परिणाम भोगावे लागतात म्हणुन आपण नेहमी -नेहमी सत्कर्म केले पाहिजे एकमेकांनी एकमेकांचे म्हणणे ऐकायला हवे  जेष्ठांचा सन्मान करावा प्रत्येकांनी शिलाचे पालन करावे नेहमी सत्कर्म करावे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन भंते सुमेधजी नागसेन यांनी केले.

ते बुद्ध धम्म वर्षावास पुनित पर्वा निमित्ताने वैशाली बुद्धविहार बौद्धनगर लातूर येथे पु.भिक्खु सुमेधजी नागसेन यांच्या धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी ते बोलत होते.तत्पूर्वी भ.बुद्ध व डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमांना पुष्प व पुष्पमाला अर्पण करून  बुद्धवंदना घेण्यात आली.यावेळी राम कोरडे यांनी भोजन दान तर राजु कांबळे यांनी खिरदान केले.यावेळी डॉ.प्रा. दुष्यंत कटारे यांची प्राचार्य पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा यथोचित  सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात भरत कांबळे,महादु गायकवाड ,सुर्यभान लातूरकर,गौतम चिकाटे,डि. के कांबळे,जगन्नाथ सुरवसे,ईश्वर कांबळे,कुमार सोनकांबळे,लता चिकटे,,आशा बानाटे,सविता चिकाटे,लता गायकवाड ,लता कांबळे,आशा गायकवाड , ललीता सिरसाटयांचेसह बौद्ध उपासक उपासिका उपस्थित  होत्या.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केशव कांबळे केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *