निराधार – अंध – अपंगाच्या मानधनात वाढ करण्याची मागणी..
निलंगा (प्रतिनिधी)
दिवसेंदिवस वाढत चाललेली महागाई यामुळे हतबल असहाय्य झालेले निराधार वृद्ध त्यात शासनाकडून मिळत असलेले तुटपुंजे मानधन यामुळे निराधार अंध अपंग परीतक्त्या यांची होत असलेली परवड थांबविण्यासाठी शासनाने निराधारांना दिल्या जाणाऱ्या निधीच्या नियमात बदल करावा त्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनात वाढ करून प्रती महिना १० हजार मानधन देण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन अखिल भारतीय मराठवाडा प्रदेश निराधार संघटनेचे संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष मधुकर कांबळे यांच्या नेतृत्वात तहसीलदार निलंगा यांना देण्यात आले आहे.
निवेदनात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की, तब्बल दहा महिन्याचा कालावधी संपला अद्याप मंजुरी बैठक घेण्यात आलेली नाही लाभार्थ्यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी व या योजनेतल्या लाभार्थ्यांच्या नियमात शिथिलता आणावी वार्षिक उत्पन्न २१ हजार रुपयांवरून एक लाखापर्यंत करण्यात यावे वय ६५ ऐवजी स६० करण्यात यावे लाभार्थ्यास एक हेक्टर जमीन मान्य करावी विकलांग किंवा अंथरणावर पडलेल्या लाभार्थ्यांना घरपोच मानधन पोचवावे तर असंख्य निराधार विधवा महिला या लाभांपासून वंचित आहेत त्यांचे वितरण करण्यात यावे अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी माधव (नाना) सूर्यवंशी, माधव चपटे, राम सूर्यवंशी, प्रशांत सोळंके, दत्तात्रेय कांबळे, लता कांबळे, नरसिंग कांबळे, गुंडप्पा ईश्वरे, विलास फुलचंद पांचाळ, सादिक खान आदी मान्यवर उपस्थित होते..
