सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल जिल्हा बँकेचे अध्यक्ष धिरज विलासराव देशमुख यांना राज्यस्तरीय पुरस्कार
लातूर :– सहकार क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल कै.बाळासाहेब घुईखेडकर यांच्या नावाने दिला जाणारा राज्य स्तरीय “उदयोन्मुख तरूण सहकारी कार्यकर्ता – 2024” हा पुरस्कार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष , माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांना देण्यात आला आहे.
राज्याचे सहकार राज्य मंत्री ना.डाॅ.पंकज भोयर यांच्या हस्ते मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले धिरज विलासराव देशमुख यांच्या वतीने जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधव यांनी पुरस्कार स्विकारलालोकनेते विलासराव देशमुख साहेब व बँकेचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी लातूर जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला बळकटी देवून योग्य दिशा दाखवली त्यामुळे देशभरात मांजरा परिवारातील साखर कारखाने,जिल्हा बँक व अन्य सहकारी संस्थांचा गौरवपूर्ण उल्लेख केला जातो.लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचा अध्यक्ष म्हणून काम करत असताना शेतकरी, सभासदांच्या हिताला डोळ्यासमोर ठेवून धिरज विलासराव देशमुख यांनी पुर्वीच्या व नव्याने अनेक योजनांचा लाभ संबंधितांना मिळवून देत असताना जिल्हा बँकेचा गौरव वाढवला.
शेतक-याची गरज लक्षात घेऊन बिन व्याजी कर्ज योजनेतील मर्यादा ३ लाखां वरून ५ लाखां पर्यंत केली, पिक कर्ज योजनेच्या माध्यमातून १७८० कोटी ऐवढे ऐतिहासिक कर्ज शेतकरी सभासदांना वाटप केले, लोकनेते विलासराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या माध्यमातून ८४२८३ शेतकऱ्यांना लाभापोटी बँकेने स्वनिधीतून संबंधित शेतक-यांना १२.१६ कोटी अदा केले, ऊस तोडणी यंत्र खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून देवून अनेक तरुण शेतक-यांना स्वतः चा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत केली, कृषी यांत्रिकी करणास चालना देत असताना ट्रॅक्टर कर्ज योजनेत सुलभता आणली, महीला बचत गटांना कर्ज मर्यादा २ वरून ५ लाख केली, रेशीम शेतीसाठी शुन्य टक्के व्याज दराने कर्ज उपलब्ध करून देत असताना कर्ज मर्यादा २ लाखा वरून ५ लाख केली, ब्रॅच ऑन व्हील द्वारे शेतक-यांना गावपातळीवर बँकींग सेवा पुरवली, मागील सलग तीन वर्षांपासून जिल्हा बँकेस १०० कोटी पेक्षा अधिक ढोबळ नफा प्राप्त करून दिला, आर्थिक वर्ष २०२४/२५ मध्ये निव्वळ नफा ७३.१५ कोटी, जिल्हा बँकेच्या सभासद खातेदारांना मोबाईल बँकिंग अॅप, युपीआय अशा अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या, ३१ मार्च २०२१ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत एकूण व्यवहार ५३७५.२४ वरून ८१३९.३६, ठेवी ३२२९.६२ वरून ४३०६.५६ , भागभांडवल ११५.०२ वरून १८४.१९,निव्वळ नफा ९.९६ वरून ७३.१५ यासह अन्य बाबीमुळे बँकेच्या आर्थिक प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली. सक्षम नेतृत्वाखाली जिल्हा बँकेचा अध्यक्ष या नात्याने काम करत असताना धिरज विलासराव देशमुख यांनी संचालक मंडळाच्या सहकार्यातून राज्यासह देशभरात बँकेचा लौकिक वाढवण्याचे काम केले आहे. भविष्यात देखील त्याच भावनेतून आपली वाटचाल सुरू राहील अशा भावना धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केल्या आहेत. सदरील पुरस्कारासाठी आपली निवड केल्याबद्दल निवड समिती व दि महाराष्ट्र बँक्स असोसिएशन च्या पदाधिका-यांचे धिरज विलासराव देशमुख यांनी आभार मानले आहेत.
