रोटरी क्लब लातूरचा पदग्रहण समारंभ उत्साहात ६ गरीब विद्यार्थ्यांना घेतले दत्तक,
१० शालेय विद्यार्थ्यांना वाटप केल्या रेंजर सायकल
लातूर : रोटरी क्लब लातूरच्या वतीने इंस्टॉलेशन सेरेमनी (पदग्रहण समारंभ) चे आयोजन शनिवार, दिनांक ५ जुलै रोजी राधिका कन्व्हेन्शन हॉल येथे करण्यात आले होते. हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रोटरीचे डीजी सुधीर लातुरे, मोहन कुमार के.व्ही. होते. मंचावर नुतन अध्यक्ष ज़कीखान कायमख़ानी, सचिव विश्वनाथ निगुडगे आणि माजी अध्यक्ष श्रीमंत कावळे उपस्थित होते.यावेळी रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ अॅसपायरेशन लातूरचाही पदग्रहण सोहळा पार पडला. नूतन अध्यक्षस्थानी कौशल्या जांबुवंतराव सोनकवडे, तर सचिव वनिता सुदेश लचुरिया आहेत . यावेळी सर्व रोटरियन्स व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह शहरातील शेकडो प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रमुख पाहुणे सुधीर लातूरे यांनी रोटरीचा उद्देश सांगून सामाजिक कार्यात पुढाकार घेण्याचे आवाहन केले.मोहन कुमार के.व्ही. म्हणाले, लातूर रोटरीने मोठे प्रोजेक्ट्स हाती घ्यावेत. लातूर सामाजिक कार्यात अग्रेसर राहणारे शहर आहे. येथून राज्यातील रोटरियन्सना सकारात्मक दिशा मिळेल.रोटरीचे नूतन अध्यक्ष ज़कीखान कायमखानी म्हणाले, रोटरी फोर वे टेस्टवर चालते. ती गाईडलाईन जर पाळली तर उद्देश सफल होतो. आपले विचार, शब्द आणि कार्य हे सत्य आहेत का? हे पारदर्शक आहेत का? त्यामुळे सुसंबंध व मित्रत्व प्रस्थापित होईल का?, ते सर्व समाजाला फायदेशीर ठरतील का?
हे चारसुत्र दिशादर्शक आहेत. सर्व रोटरीयन्सना आवाहन आहे की त्यांनी वरील सुत्र आपल्या डोळ्यासमोर ठेवून कार्य करावे. हे सुत्र आपल्या दैनंदिन जीवनात ही वापरावेत. यावेळी त्यांनी वर्षभर केल्या जाणाऱ्या कामांची माहिती दिली.पूर्व अध्यक्ष श्रीमंत कावळे यांनी गतकार्याचा आढावा सादर केला.सूत्रसंचालन डॉ. गोपाल बाहेती यांनी केले. यावेळी विनोद लड्डा, मोहन परदेशी, रामप्रसाद राठी, प्रवीण होळीकर, हर्षद राजूरकर आदींसह रोटरीयन्स उपस्थित होते. आभार विश्वनाथ निगुडगे यांनी मानले.
—
१० सायकल्सचे वितरण…
लातूर शहरातील गरीब आणि शाळेत जाणाऱ्या १० विद्यार्थ्यांना सायकल्स वितरित करण्यात आल्या. या वेळी त्या विद्यार्थ्यांचे पालकही उपस्थित होते.दहा विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले…
रोटरी क्लबच्या वतीने अनाथ आणि अत्यंत गरजू कुटुंबातील १० विद्यार्थ्यांना दत्तक घेण्यात आले. त्यांच्या राहण्या-खाण्याचा तसेच शैक्षणिक खर्चाचा संपूर्ण भार रोटरी क्लब उचलणार आहे.
