तीस वर्षापासून फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक.
लातूर :- याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस ठाणे देवणी येथे 1994 महाराष्ट्र कॉटन ऍक्ट गुन्ह्यातील आरोपी नामे गोविंद तुकाराम राठोड याचे विरुद्ध पोलीस ठाणे देवणी येथे गुन्हा दाखल झाला होता. सदरचा गुन्हा दाखल झाल्यापासून नमूद आरोपी फरार होता. तो सतत त्याचे राहण्याचे ठिकाणे तसेच ओळख लपवून इतरत्र राहत असल्याने मिळून येत नव्हता.
पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी विविध गुन्ह्यातील फरार आरोपींचा आढावा घेऊन त्यांना अटक करणे बाबत आदेशित केले होते. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक अमोल तांबे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकाने फरार आरोपींची माहिती घेऊन सदर माहितीचे विश्लेषण करून सन 1994 मधील पोलीस ठाणे देवणी येथे दाखल असलेल्या महाराष्ट्र कॉटन गुन्ह्यामधील फरार आरोपी नावे
1)गोविंद तुकाराम राठोड, वय 59 वर्ष, राहणार ढोबळेवाडी, तालुका गंगाखेड जिल्हा परभणी यास दिनांक 01 जुलै 2025 रोजी नवीन रेनापुर नाका परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे .पुढील तपास कामी पोलीस ठाणे देवणी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथकामधील पोलिस अमलदार विनोद चलवाड, राजेश कंचे, सूर्यकांत कलमे यांनी केली आहे.
