• Thu. May 8th, 2025

जुन्या वाहनांवर ३० जूनपूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक

Byjantaadmin

May 8, 2025

जुन्या वाहनांवर ३० जूनपूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक

·         लातूर जिल्ह्यातील अधिकृत फिटमेंट सेंटरद्वारे सुविधा उपलब्ध

लातूर, : जिल्ह्यातील १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या वाहनांवर सर्व जुन्या नोंदणीकृत वाहनांवर ३० जून २०२५ पूर्वी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यातील वाहनधारकांनी नजीकच्या अधिकृत फिटमेंट सेंटर येथून हायसिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.

वाहनांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड व बनावटगिरी करून होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, यासह राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविणे आवश्यक असून सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत निर्देश दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून राज्य शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी उत्पादित झालेल्या सर्व वाहनांवर हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्याचा निर्णय घेतला आहे. या सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट बसविण्यासाठी लातूर जिल्ह्यातील अधिकृत फिटमेंट सेंटरची यादी परिवहन विभागाच्या https://transport.maharashtra.gov.in/ZoneWiseWebsiteRedirect.html या लिंकवर उपलब्ध आहे. या लिंकवर जावून एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्यासाठी बुकींग करावी.

३० जून २०२५ रोजी नंतर जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याबाबत शासनाकडून कोणतीही मुदतवाढ देण्यात आलेली नाही. ३० जून, २०२५ नंतर जुन्या वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट न बसविलेल्या वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल येणार आहे. तरी वाहनधारकांनी एचएसआरपी बसविण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे आवाहन प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *