• Sun. May 4th, 2025

एलटीआर सॉफ्ट मधील ४० विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

Byjantaadmin

May 4, 2025

एलटीआर सॉफ्ट मधील ४० विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ संपन्न

लातूर : अंबाजोगाई रोड येथील एलटीआर सॉफ्ट मधील ४० विद्यार्थ्यांची टिसीएस, विप्रो व जेड ग्लोबल या
अग्रगण्य मल्टिनॅशनल कंपन्यांमध्ये निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार समारंभ दिनांक २ मे
२०२५ रोजी दुपारी ३.३० मिनिटांनी विश्वेश्वरय्या इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेकनॉलॉजि, लातूर यांच्या सभागृहात पार
पडला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री विश्वेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ आलमला संस्थेचे सचिव मा. श्री. बसवेश्वर धाराशिवे
सर, टिसीएस येथे कार्यरत असलेले कु समीक्षा भुतडा, कॉग्निझंट येथे कार्यरत असलेले चि. वेदांत नोगजा, टीपीओ
शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी श्री युवराज कटू सर, श्री विकास सगरे सर, संस्थापक व डायरेक्टर एलटीआर सॉफ्ट श्री
किशोर जेवे सर, सह-संस्थापक व डायरेक्टर एलटीआर सॉफ्ट श्री अमोल कुंभार सर उपस्थित होते. अलंकार जाधव, संतोष
सातपुते, वैष्णवी चव्हाण, वैष्णवी कुंभार, दीपिका फावडे, अदिती कुलकर्णी, पवन सुर्यवंशी, ऋषिकेश आंबेगावे, वनिता
जाधव, परवीन शेख, श्रद्धा पोतदार, भाग्यश्री नणंदकर, ज्ञानेश्वरी बडे, ज्योती लासूने, वैष्णवी जानकर, ओंकार साखरे, वैभवी
पाटील, गणेश काळे, अभिजित काडवाडे, श्रुष्टि येरोळकर, महेश पोले, झैद पठाण, साक्षी बनसोडे, सुमित स्वामी या
विद्यार्थ्यांची टिसीएस मध्ये निवड झाली आहे. तसेच अखिलेश साळवे, विघ्नेश पंडित, वैष्णवी जानकर यांची विप्रो मध्ये तर
अनुराग दायमा याची जेड ग्लोबल या कंपनीमध्ये निवड झाली आहे. संतोष सातपुते, कोमल वडसकर, अभिषेक शिंदे, गणेश
शिंदे, अखिलेश साळवे, अलंकार जाधव, यांची इन्फोसिस इंटर्नशिप पूर्ण झाली आहे. तसेच प्रथमेश जाधव, गणेश शिंदे व
अभिषेक शिंदे यांची मायक्रोसॉफ्ट इंटर्नशिप पूर्ण झाली आहे. अनुराग दायमा व श्यामकुमार दीक्षित इंटरनॅशनल स्टुडन्ट रिसर्च
कॉन्व्हेंशन मध्ये द्वितीय आले असून आकाश पवार, पवन सुर्यवंशी यांनी सीड हॅकॅथॉन मध्ये चांगली कामगिरी केली. या सर्व
विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सत्कार शाल, श्रीफळ व सर्टिफिकेट देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी बोलताना कु समीक्षा भुतडा व चि वेदांत नोगजा यांनी कंपनी मध्ये कामाची पद्धत, गरजेचे स्किल्स व कंपनीमध्ये
रुजू होईपर्यंत करावयाची तयारी यावर मार्गदर्शन केले. श्री किशोर जेवे सरांनी आत्तापर्यंतची एलटीआर सॉफ्टची
वाटचाल तसेच आयटी क्षेत्रात लागणारी कौशल्ये व नोकरी मिळवण्यासाठी करावयाची तयारी यावर भर दिला. आपल्या
भाषणात श्री बसवेश्वर धाराशिवे सरांनी आजच्या काळात मुले व मुली यांना सामान संधी असून या संधीचा फायदा प्रत्येकाने
घ्यावा असे सांगितले. हि संधी आपल्या ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावी यासाठी सायन्स व कॉमर्स विषय
असलेले विश्वेश्वरय्या जुनिअर कॉलेज व बीएससी, बीकॉम व बीसीए ह्या शाखा असलेले विश्वेश्वरय्या इन्स्टिटयूट ऑफ
मॅनेजमेंट अँड टेकनॉलॉजि कॉलेज सुरु करत असल्याची घोषणा केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु प्रतीक्षा करकुले यांनी
केले . याप्रसंगी सर्व उपस्थितांनी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिष्टचिंतन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *