लातूर क्रेडाईचे कार्य महाराष्ट्राला दिशादर्शक – प्रफुल्ल तावरे
क्रेडाई लातूर नूतन कार्यकारिणीचे पदग्रहण
लातूर /प्रतिनिधी: लातूर पॅटर्न हा फक्त शिक्षण क्षेत्रातच नाही तर बांधकाम क्षेत्रातही लातूर क्रेडाईने राज्याला दिशादर्शक काम केले आहे.हा पॅटर्न आज राज्यभर गाजत असल्याचे मत क्रेडाईचे महाराष्ट्राचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे यांनी व्यक्त केले.
क्रेडाईच्या नूतन कार्यकारणीच्या पदग्रहण समारंभात प्रफुल्ल तावरे बोलत होते. या कार्यक्रमास माजी मंत्री आ. अमित देशमुख, आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्यासह मनपा आयुक्त देविदास जाधव, क्रेडाई नॅशनल कौन्सिलचे सुनील कुरडे, महाराष्ट्राचे खजिनदार सुरेंद्र भोईटे, लातूर जिल्हा क्रेडाईचे माजी अध्यक्ष जगदीश कुलकर्णी, दीपक कोटलवार, सुबोध बेळंबे, धर्मवीर भारती, माजी सचिव संतोष हत्ते यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात 2025 ते 27 या दोन वर्षांसाठी अध्यक्ष म्हणून उदय पाटील व सचिव म्हणून विष्णू मदने यांच्यासह कार्यकारिणीने पदभार स्वीकारला.
उपस्थितांना संबोधित करताना प्रफुल्ल तावरे यांनी लातूर क्रेडाईच्या कार्याचे कौतुक केले. लातूर हे गतीने विकसित होणारे शहर असून या शहराच्या विकासात क्रेडाईचाही वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले.
मनपा आयुक्त देविदास जाधव यांनी मागील 15 वर्षात लातूरची लोकसंख्या 100 टक्के वाढली असल्याचे सांगितले.वाढणाऱ्या लोकसंख्येसोबतच पार्किंग सारख्या समस्यातही वाढ झाली आहे.या समस्या सोडविण्यासाठी मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी मार्गदर्शन करताना आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, बारामतीच्या लोकांनी लातूरचे कौतुक केल्याचा मनोमन आनंद वाटला.पार्किंग ही जागतिक समस्या आहे.या विषयावर मे महिन्यात जपान मधील टोकियो शहरात जागतिक परिषद होणार आहे.त्या परिषदेत या संदर्भात उपाययोजना सुचवल्या जातील. त्याचे अनुकरण करावे,असे ते म्हणाले.लातूर शहरात आज सत्ताधारी आणि विरोधकांच्या भूमिका कळत नसल्याचे त्यांनी सांगितले.सत्ताधारी मोर्चे काढत आहे तर विरोधक अधिकाऱ्यांच्या बैठका घेत आहेत. आज आम्ही सत्तेत आहोत.तुम्ही सत्तेत असल्याचे विसरून जा, अशी कोपरखळी त्यांनी आ. देशमुख यांना लगावली. सत्तेत आल्यानंतर कसे वागावे ? याचा क्लास आ. देशमुख यांनी घ्यावा तर विरोधात काम कसे करावे ? या संदर्भात आम्ही मार्गदर्शन करू,अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी केली.
विकासासाठी लातूरचा सुसंस्कृत वारसा जपत एकत्र येऊन काम करू, असेही ते म्हणाले.
आ.अमित देशमुख यांनी लातूरची राजकीय संस्कृती वेगळी असून नेते कधीही प्रशासनात हस्तक्षेप करत नाहीत असे सांगून टाकले.16 वर्षांपासून आमदार असताना एकदाही अधिकाऱ्यांना कुठल्या कामासाठी शिफारस म्हणून आपण फोन केलेला नाही.अधिकाऱ्यांनी सामान्य माणसांची कामे काळजीपूर्वक करावी.त्यांनी कामे केली नाहीत तर विरोधी पक्ष म्हणून आम्ही सक्षम आहोत.आ. संभाजी पाटीलही आमच्या सोबत आहेत, असे ते म्हणाले. महिला सन्मानाबाबत अनेक जण बोलतात पण क्रेडाईने ते प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिले आहे.लातूर क्रेडाईमध्ये महिलांचा मोठा सहभाग आहे.
शहरात लोकसंख्या वाढली असली तरी सर्वजण मिळून समस्या दूर करण्यासाठी काम करू,असेही ते म्हणाले.
प्रारंभी मावळते अध्यक्ष जगदीश कुलकर्णी यांनी मागील दोन वर्षांच्या कार्याचा आढावा सादर केला.दोन वर्षात राज्य पातळीवरील पाच पुरस्कार लातूर शाखेने पटकावले असून यामुळे राज्यात लातूरचा दबदबा असल्याचे ते म्हणाले. उदय पाटील यांनी पुढील दोन वर्षाच्या कामकाजाच्या आराखड्याची माहिती दिली.
या कार्यक्रमात क्रेडाई लातूरच्या वर्ष
2025 ते 27 या कालावधीसाठी निवडण्यात आलेल्या कार्यकारिणीने पदभार स्वीकारला त्यात अध्यक्ष
उदय पाटील,सचिव
विष्णू मदने,खजिनदार
आशिष कामदार, उपाध्यक्ष
किरण मंत्री व
महेश नावंदर,
अमोल मुळे,
श्रीकांत हिरेमठ,सहसचिव
नागनाथ गित्ते,
जयकांत गित्ते,
नितिन मंडळे,
आकाश कोटलवार, सह खजिनदार विक्रम सुरवसे,युवा समन्वयक सुरज मंत्री,युवा सह-समन्वयक रितेश अवस्थी,
पुष्कराज हेडा,
महिला समन्वयक रश्मी बेळंबे,
स्मिता देशपांडे यांचा समावेश आहे
या कार्यक्रमास माजी आमदार वैजनाथ शिंदे,लातूर शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष किरण जाधव, विलास सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन समद पटेल, ट्वेंटी वन शुगरचे व्हाईस चेअरमन विजय देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, माजी सभापती शैलेश गोजमगुंडे, सभापती दीपक मठपती, गोपाळ शिंदे,ॲड. संजय पांडे, प्रदीप नणंदकर, नरेंद्र काळे, ॲड. मोश्याक, अनंत गायकवाड मराठा सेवा संघाचे जिल्हा सचिव एम.एम. जाधव व त्यांची कार्यकारिणी, इंजिनिर्स अससोसिएशनचे अध्यक्ष अभिजीत सरसंभेकर व त्यांची कार्यकारिणी,आर्किटेक्ट अससोसिएशनचे अध्यक्ष मनोज सूर्यवंशी व त्यांची कार्यकारिणी, वकील मंडळाचे अध्यक्ष ॲड. योगेश जगताप व त्यांची कार्यकारिणी, IMA चे अध्यक्ष डॉ अभय कदम व त्यांची कार्यकारिणी, CA संघटनेचे अध्यक्ष महेश तोष्णीवाल व त्यांची कार्यकारिणी,SRJ स्टीलचे सर्व पदाधिकारी,क्रेडाई लातूरच्या प्रत्येक कार्यमासाठी sposership देणारे सर्व व्यापारी, यांच्यासह क्रेडाई लातुरचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
