• Wed. Apr 30th, 2025

निलंगा येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी

Byjantaadmin

Apr 30, 2025

निलंगा येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्साहात साजरी 

निलंगा:-  निलंगा शहरात समतानायक जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांची जयंती प्रतिमा पूजन,  ध्वजारोहण, मोटारसायकल रॅली यासह विविध उपक्रमाने उत्साहात साजरी करण्यात आली.सकाळी ८वा  महात्मा बसवेश्वर वाचनालय, बसव सृष्टी निलंगा येथे माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांचे शुभ हस्ते महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन व षटस्थल ध्वजाचे  ध्वजारोहण  करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री तेरणी पाटील मॅडम,  लातूर जिल्हा मजूर संस्थेचे संचालक शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद आर्य, शिवाजी रेशमे गुरुजी, भाजपा शहराध्यक्ष रवी फुलारी, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंगाडे, माजी उपनगराध्यक्ष मनोज कोळ्ळे, संगन बसव स्वामी विरक्त मठाचे अध्यक्ष अमोल आर्य,

बसव जयंती उत्सव सोहळा समितीचे अध्यक्ष सोमनाथ आग्रे, सचिव राजकुमार चिकराळे  , इंजिनिअर एम के कस्तुरे, युवराज बिराजदार, प्रकाश शेटकार,  शंकर भुरके ,प्रशांत सोरडे,  वीरभद्र आग्रे, श्रीशैल बिराजदार , बुद्धिवंत मुळे, डॉ . विक्रम कुडुंबले, राजकुमार निला, शिवप्रसाद मुळे, रत्नेश्वर गताटे, नवनाथ कुडुंबले, शिवकुमार रुकारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. 

यावेळी आमदार संभाजीराव पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून मोटरसायकल रॅलीचे शुभारंभ करण्यात आले. मोटरसायकल रॅली शहरातून बसवेश्वर नगर येथून सुरुवात होऊन जिजाऊ चौक, दापका वेस, संगन बसव स्वामी  विरक्त मठ, बसवेश्वर मंदिर पेठ, जुने पोलीस ठाणे, महारुद्र चौक, बसवेश्वर चौक, आनंद मुनी चौक,  शिवाजी चौक मार्गे एस.टी आगार निलंगा येथे मोटरसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला. दरम्यान महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीच्या वतीने शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले.याप्रसंगी बसव प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संगन बसव मठ निलंगा येथे मठाधीपती संगन बसव स्वामी यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व बसवेश्वर प्रतिमा पूजन करण्यात आले. बसवेश्वर मंदिर पेठ येथे अनुभव मंटप महिलाच्या वतीने इष्टलिंग पूजा करून बसव जयंती साजरी करण्यात आली. बसवेश्वर चौक येथे प्रशांत सोरडे, सोमनाथ धर्मशेट्टी, महेश शेटकार, गुंडप्पा मंठाळे, अशोक शेटकार, बसवराज राजुरे, राजेंद्र सोरडे यांच्या उपस्थितीत बसवेश्वर चौकाच्या फलकाचे अनावरण पूजा अर्चा करून बसव जयंती साजरी करण्यात आली. निलंगा वकील मंडळाच्या वतीने वकील कक्षात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्यात आली. एसटी आगार निलंगा येथे आगार प्रमुख अनिल बिडवे यांच्या प्रमुख उपस्थितीत बसव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, याप्रसंगी वचन साहित्याचे अभ्यासक डॉ मन्मथ गताटे यांनी जागतिक कामगार दिन व महात्मा बसवेश्वरांचे विचार यांचे महत्त्व प्रतिपादन केले. निलंगा एसटी आगारात प्रवासी व भाविक भक्तांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी मच्छिंद्र कोळी, ऋषी जगदाळेसंतोष बिडवे, संदीप शेटकार, राजू बिराजदार, दयानंद मंदाडे, सुरेश पेद्दे, प्रमोद जीवने, तोंडारे , अनिल बिराजदार, बसवराज स्वामी, नागेश कुमठेकर, अजित बिराजदार, विश्वनाथ ठमके, किरण पाटील, नागाशंकरे, यांच्या सह एस.टी. कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *