• Mon. Apr 28th, 2025

धिरज विलासराव देशमुख यांच्या दूरध्वनीमुळे हलली चक्र, महावितरण ने तत्परतेने घेतली दखल, ठप्प झालेली रोहित्र दुरुस्ती पुन्हा सुरू होणार

Byjantaadmin

Apr 25, 2025

रोहित्र दुरुस्तीसाठी लातूरात आले 5 हजार लिटर ऑइल

धिरज विलासराव देशमुख यांच्या दूरध्वनीमुळे हलली चक्र, महावितरण ने तत्परतेने घेतली दखल, ठप्प झालेली रोहित्र दुरुस्ती पुन्हा सुरू होणार

लातूर :

‘लातूर ग्रामीण’मध्ये ऑइलचा तुटवडा असल्याने रोहित्र दुरुस्ती ठप्प झाल्याच्या आणि जुने रोहित्र बदलून नवीन रोहित्र दिले जात नसल्याच्या शेतकरी बांधवांच्या तक्रारींची तत्परतेने दखल घेत माजी आमदार श्री. धिरज विलासराव देशमुख यांनी महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून शेतकऱ्यांवर ओढावलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आणून दिले. त्यामुळे काही तासात लातूर विभागासाठी तब्बल पाच हजार लिटर ऑइल महावितरणच्या मुंबई कार्यालयाने उपलब्ध करून दिले.

उन्हाळा सुरू असल्यामुळे ठिकठिकाणच्या रोहित्रावरील भार वाढला आहे. त्यामुळे रोहित्र नादुरुस्त होण्याचे, जळण्याचे प्रमाण वाढत आहे. पण लातूरात ऑइलचा तुटवडा असल्याने रोहित्र दुरुस्ती ठप्प झाली आहे. जुने रोहित्र बदलून नवीन रोहित्रही दिले जात नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे अशी मागणी माजी आमदार श्री धिरज विलासराव देशमुख यांनी राज्य सरकारकडे पत्राद्वारे केली. शिवाय, महावितरणचे मुंबई येथील मुख्य अभियंता श्री प्रवीण परदेसाई यांना दूरध्वनीही केला.

माजी आमदार श्री धिरज विलासराव देशमुख यांच्याकडून शेतकऱ्यांची व्यथा समजून घेऊन श्री परदेसाई यांनी काही तासात रोहित्र दुरुस्तीसाठी 5 हजार लिटर ऑइल उपलब्ध करून दिले. याबाबतचे पत्रही त्यांनी पाठवले. माजी आमदार श्री धिरज विलासराव देशमुख यांच्या पाठपुरावामुळे कोळपा, रामेगाव, लखमापूर, टाकळी, भातखेडा या गावांसह लातूर ग्रामीण मधील जवळपास 40 गावातील रखडलेल्या रोहित्र दुरुस्तीचे आणि विद्युत पुरवठा पूर्ववत होण्याचे काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पिकांना आणि पशुधनाला पाणी मिळणार असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे लातूर ग्रामीण मधील अनेक शेतकऱ्यांनी माजी आमदार श्री धिरज विलासराव देशमुख यांचे आभार मानले.

मुबलक प्रमाणात ऑइल उपलब्ध झाल्याने आता लातूर मधील महावितरण च्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी रोहित्र दुरुस्तीचे काम जलद गतीने करून शेतकरी बांधवांना दिलासा द्यावा अशी अपेक्षा माजी आमदार श्री धिरज विलासराव देशमुख यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed