• Tue. Apr 29th, 2025

मांजरा साखर कारखान्याचा अंतीम भाव 3005 रूपये

Byjantaadmin

Apr 17, 2025

मांजरा साखर कारखान्याकडुन चालू गळीत हंगाम गाळपास आलेल्या ऊसाला प्रती मे.टन रु.205/- प्रमाणे अंतिम बिल ऊस पुरवठादाराच्या खात्यावर जमा

मांजरा साखर कारखान्याचा अंतीम भाव 3005 रूपये

सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख यांच्या अमृतमहोत्सवी 75 व्या वाढदिवसाचे औचित्य साधून खात्यावर रक्कम जमा

विलासनगर, लातूर दि. १६.

राज्यातील साखर उद्योगांमध्ये दीपस्तंभ असलेल्या विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम 2024-25 यशस्वीपणे संपन्न झाला असुन, मांजरा परिवाराचे कुटुंबप्रमुख सहकार महर्षी श्री दिलीपरावजी देशमुख साहेब यांनी या हंगामात कारखान्याकडे गाळपास येणाऱ्या ऊसासाठी किमान 3000 /- रुपये प्रति मॅट्रिक टन ऊस दर देण्याचे जाहीर केलेले होते. कारखान्याकडून या अगोदर ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रति मे.टन 2800 /- रुपये अदा केलेले आहेत. शेती व उन्हाळी कामांसाठी शेतकऱ्यांना मदत व्हावी यादृष्टीने, या गाळप हंगामामध्ये गाळपास आलेल्या ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना प्रति मे.टन रु.205/- रूपये दि. 16 एप्रिल 2025 रोजी ऊस बिलाचा अंतिम हप्ता, ऊस पुरवठादारांच्या खात्यावर जमा केला आहे. यानुसार एकूण 3005 रू. अंतिम ऊसदर शेतक-यांना अदा करण्यात आले आहेत.

मांजरा परिवाराचे मार्गदर्शक सहकार महर्षी दिलीपरावजी देशमुख साहेबांनी दिलेला शब्द पाळत शेतक-यांच्या कष्टाला डोळ्यासमोर ठेवून तीन हजार पेक्षा अधिक दर दिला असल्याने उस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे

कारखान्याची यशस्वी घौडदौड

कारखान्याने या गळीत हंगामामध्ये 3,23,601 मे. टन उसाचे गाळप केले असून 3,16,500 क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. कारखान्याने वीज वितरण कंपनीस 1,91,29,543 के डब्ल्यू एच विजेची निर्यात केली आहे.ज्युस सिरप व बी हेवीसह सरासरी साखर उतारा 11.866 % टक्के प्राप्त झाला आहे. अर्कशाळा विभागाकडून 62,24,620 लिटर आर एस व 44,48,756 लिटर इथेनॉल चे उत्पादन घेतले आहे.
चालु गाळप हंगाम कारखान्याचे चेअरमन व मांजरा परिवाराचे प्रमुख,मार्गदर्शक राज्याचे माजी मंत्री दिलीपरावजी देशमुख साहेब माजी मंत्री आमदार अमित देशमुख जिल्हा बँकेचे चेअरमन धिरज देशमुख यांच्या नियोजन व मार्गदर्शनामुळे सुरळीत पार पडला आहे‌.

अंतिम उसाचा हप्ता बँक खात्यावर जमा

तरी ज्या ऊस पुरवठादारांचा गळीत हंगाम 2024/2025 मध्ये ऊस कारखान्यास गाळपास आला आहे त्यांनी आपल्या संबधीत बँक शाखेशी संपर्क करावा व अंतीम बिलाची रक्कम घ्यावी असे आवाहन कारखाना व्यवस्थापनाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed