• Mon. Apr 28th, 2025

रयतू बाजार भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा पुढाकार

Byjantaadmin

Jan 31, 2025

रयतू बाजार भाजीपाला विक्रेत्यांच्या समस्या सोडवण्यासाठी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचा पुढाकार
बाभळगाव निवासस्थानी भाजीपाला, फळे, फुले विक्रेत्यांची घेतली भेट

लातूर प्रतिनिधी : लातूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने दयानंद गेट परिसरातील
रयतू बाजार हटवल्यानंतर विस्थापित झालेल्या भाजीपाला, फळे, फुले
विक्रेत्यांनी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व
लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची आज
शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी सकाळी बाभळगाव निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांनी त्यांच्या अडचणी समस्या ऐकून
घेतल्या. शहरातील नागरिकांना स्वस्तात भाजीपाला उपलब्ध करून देणाऱ्या
व्यवसायिकांचे पुनर्वसन करावे अशी आपण जिल्ह्याचे पालकमंत्री छत्रपती
शिवेंद्रसिंह राजेभोसले यांच्याकडे आपण कालच डीपीडीसी बैठकीदरम्यान मागणी
केली होती याबद्दल शिष्टमंडळातील सदस्यांनीही त्यांचे आभार मानले.
या भाजीपाला, फळे, फुले, विक्रेत्यांना कायमस्वरूपी पर्यायी जागा उपलब्ध
करून देईपर्यंत त्यांना व्यवसायासाठी तात्पुरती जागा उपलब्ध करून द्यावी,
अशी सूचनाही या शिष्टमंडळासमोरच लातूर महानगरपालिकेचे आयुक्त श्री
बाबासाहेब मनोहरे यांना दूरध्वनीवरून केली, महानगरपालिकेने भाजीपाला,
फळे, फुले विक्रीसाठी तात्पुरती उपलब्ध करून दिल्यानंतर त्या ठिकाणी कचरा
साठवून परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही किंवा रस्ता वाहतुकीला
अडथळा होणार नाही याची दक्षता विक्रेत्यांनी घ्यावी अशी ही सूचना
याप्रसंगी केली.. शहरातील नागरिकांना योग्य दरात भाजीपाला उपलब्ध करून
देण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य मोबदला मिळवून देण्याची
भूमिका पार पाडणाऱ्या या व्यवसायिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध
असल्याचे सांगून त्यांना यावेळी आमदार अमित विलासराव देशमुख यांन धीर
दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed