माझी सुट्टी माझा अभ्यास तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त वार्षिक क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण

निलंगा-दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडारवाडा बुजरुगवाडी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आला.यानंतर गावचे सरपंच श्री शिवाजी जाधव साहेब, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष पिराजी जाधव साहेब, माजी अध्यक्ष अशोक पवार साहेब ,विजय सूर्यवंशी, विनोद पवार ,संजय जाधव, व इतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा स्पर्धेत विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन त्यांचे कौतुक करण्यात आले त्याचबरोबर दिवाळीमध्ये घेण्यात आलेल्या *माझी सुट्टी, माझा अभ्यास* या उपक्रमामध्ये इयत्ता चौथीतील शिवकुमार जयकुमार पवार या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल शाळेच्या वतीने त्या विद्यार्थ्याला शंभर रुपयाचे शैक्षणिक साहित्य बक्षीस देऊन त्याचे कौतुक करण्यात आले व इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळालि.