‘महाराष्ट्र’ महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन
निलंगा – येथील महाराष्ट्र महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभाग तसेच तहसील कार्यालय निलंगा यांच्या संयुक्त विद्यमाने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात निबंध,वक्तृत्व, घोषवाक्य रांगोळी, भित्तिपत्रक या स्पर्धांचा समावेश होता. यात महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला यशस्वी विद्यार्थ्यांना नायब तहसीलदार श्री.विनोद करमानकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .माधव कोलपुके यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले. सक्षम लोकशाहीसाठी निवडणूक साक्षरता, मताधिकाराची सक्ती करावी का?, एका बोटावरच्या शाईची किंमत अशा विविध विषयावर आधारित या स्पर्धा घेण्यात आल्या.
भितीपत्रक स्पर्धेत पवार पद्माकर, घोसाळे अक्षय, सोमवंशी मोनिका.घोषवाक्य स्पर्धेत सय्यद सानिया ,लंगोटे सरस्वती, काळे नंदिनी. निबंध स्पर्धेत कुलकर्णी गौरी, धुमाळ पूजा, सुरवसे शिवदीक्षा. रांगोळी स्पर्धेत पवार पद्माकर, साळुंखे भूमिका, घोसाळे अक्षय. वकृत्व स्पर्धेत हवा प्रगती, सोमवंशी मोनिका, वाडकर गीता या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव कोलपुके हे होते. यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक करून लोकशाहीच्या बळकटीसाठी मतदानाचे महत्त्व काय आहे याची जाणीव त्यांनी करून दिली. राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या विविध स्पर्धांचे परीक्षण डॉ. भास्कर गायकवाड, डॉ. अजित मुळजकर, डॉ. मीनाक्षी बोंडगे, प्रा. पूनम सातपुते, प्रा. पृथ्वी फावडे यांनी केले. विचार मंचावर अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.ज्ञानेश्वर चौधरी, राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. शिवरुद्र बदनाळे यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. पूनम सातपुते, प्रा. दत्ता पवार, प्रा. पृथ्वी फावडे, श्री. सुनील वाकळे आदींनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मतदान शपथ प्रा. शिवरुद्र बदनाळे यांनी दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. कमल गोमसाळे, कु. मोनिका सोमवंशी यांनी केले तर आभार प्रा. पौर्णिमा माने यांनी मानले.
