लिंबाळा येथे महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर संपन्न
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे सात दिवसीय वार्षिक विशेष शिबिर मौजे लिंबाळा येथे दिनांक २३ ते २९ जानेवारी २०२५ या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा समारोप समारंभ कासारशिरसी पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. प्रविण राठोड, पंचायत समिती निलंगा येथील प्रविण डोईजोडे यांच्या उपस्थितीत पार पडला.
समारोप समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना मा. प्रविण राठोड यांनी विद्यार्थ्यांची गावाशी नाळ जोडणे हा हेतू एन एस एस चा हेतु असला तरी स्वच्छतेचा संदेश इतरांना देत असताना आपणही स्वच्छता पाळावी हा विचार विद्यार्थ्यांनी स्विकारावा त्यातुन विचारांचीही स्वच्छता आपल्यात निर्माण करावी. त्याचबरोबर डिजीटल लिटरसी ही पण सध्या काळाची गरज बनली आहे, रिल्सच्या दुनियेत न वावरता वास्तव जीवन ओळखले पाहिजे असे मत व्यक्त केले.
समारोप समारंभासाठी उपस्थित निलंगा पंचायत समिती येथील मा. प्रविण डोईजोडे यांनीही जगन्नाथाच्या रथाप्रमाणे समाजसेवेचे, स्वच्छतेचा शिकवण देणारा हा एनएसएस चा सेवावृत्तीचा रथ आपण पुढे नेत असताना त्याचा स्विकार आपणही केला पाहिजे असे मत व्यक्त केले. याप्रसंगी उपस्थित कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा प्रशांत गायकवाड यांनीही रासेयो शिबिराचा उद्देश या सात दिवसांत सफल झाल्याचे समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ भास्कर गायकवाड यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी ही समाजसेवेचे ब्रिद, श्रमसंस्कार, नेतृत्वगुण, चारित्र्य संवर्धनाचे धडे, आपल्या सोबत घेऊन जावे त्यातून आपले भविष्य उज्ज्वल करावे असे मत व्यक्त केले.
या समारोप समारंभाचे प्रास्ताविक करत असताना सात दिवसीय शिबिरात राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती कार्यक्रम अधिकारी डॉ विठ्ठल सांडूर यांनी दिली तर आभार प्रा. श्रीकृष्ण दिवे यांनी व्यक्त केले.
ग्रामस्थांच्या वतीने बोलत असताना सरपंच श्री सखाराम कलबोने यांनी सात दिवसीय शिबिरातील उपक्रमांमुळे, श्रमदानातून गावातील स्वच्छता केली यामुळे गावातील लोकांना प्रेरणा मिळाली असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर उपसरपंच श्री बालाजी माने यांनीही या शिबिराच्या माध्यमातून गावात जनजागृती मोठ्या प्रमाणात झाली, ग्रामस्थांची आरोग्य तपासणी, पशु रोगनिदान व औषधोपचार शिबिर आयोजित केल्याबद्दल आनंद व्यक्त केला. या समारोप समारंभासाठी वैजनाथ सुर्यवंशी, गणेश पवार, ज्ञानोबा गोपाळराव माने, गोपागावातील प्रतिष्ठित नागरिक, महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी शिबिरार्थी स्वयंसेवक व स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या शिबिराच्या यशस्वितेसाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ सुभाष बेंजलवार, डॉ विठ्ठल सांडुर, प्रा. श्रीकृष्ण दिवे, सरपंच श्री सखाराम कलबोने, उपसरपंच श्री बालाजी माने व ग्रामपंचायत सदस्य, रासेयो स्वयंसेवक, शेख आझम, ओम कांबळे, तुळशीराम बोयणे, यांनी परिश्रम घेतले.
