पत्रकारीतेतून समाजाचा विकास झाला पाहिजे – सहाय्यक संचालक डॉ. शाम टरके
६ जानेवारी दर्पण दिनानिमित्त पत्रकार बांधवांचा सत्कार सोहळा संपन्न
लातूर/प्रतिनिधी (दि.६ जाने) : आपल्या पत्रकारीतेतून समाजाचा विकास झाला पाहिजे असे मत लातूर विभागीय माहिती कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. शाम टरके यांनी ६ जानेवारी २०२५ रोजी दयानंद कला महाविद्यालय लातूर येथे दर्पण दिनानिमित्त आयोजित पत्रकार सत्कार सोहळ्यात मांडले.
६ जानेवारी रोजी आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण नावाचे पहिले मराठी भाषेतील वृत्तपत्र सुरू केले होते. म्हणून महाराष्ट्रात ६ जानेवारी हा पत्रकार दिन दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघ व दयानंद कला महाविद्यालय लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उपस्थितीत पत्रकार बांधवांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन लातूर विभागीय माहिती कार्यालयाचे सहाय्यक संचालक डॉ. शाम टरके यांच्या हस्ते करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दयानंद कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य दिलीप नागरगोजे हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा माहिती कार्यालयाचे जिल्हा माहिती अधिकारी श्री तानाजी घोलप, उपप्राचार्या डॉ. अंजली जोशी, प्रसिद्ध शाहीर प्रा. संदिपान जगदाळे व लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रविकिरण सुर्यवंशी मसलगेकर व संस्थापक सचिव दत्तात्रय जी परळकर हे मंचावर उपस्थित होते.
ते पुढे असे म्हणाले आपल्या पत्रकारीतेतून पत्रकारांनी वंचित समाजाला जागृत करून आपल्या लेखणी या शस्त्राचा वापर सकारात्मक ध्येय ठेवून पत्रकारीता करावी व पत्रकारीतेतील आधुनिक बदल स्विकारावेत असे आवाहन करून पत्रकार बांधवांना दर्पण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. व लातूर जिल्हा माहिती अधिकारी तानाजी घोलप यांनी ए आय सारख्या तंत्रज्ञानाचा वापर पत्रकारीतेत करण्याचे आवाहन करत दर्पण दिनानिमित्त पत्रकार बांधवांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जेष्ठ पत्रकार सुभाषचंद्र नाईक, जेष्ठ पत्रकार राजेंद्र वनारसे, पत्रकार बाळासाहेब जाधव, लिंबराज पन्हाळकर, योगीराज पिसाळ, विलास कांबळे घारगावकर, लहुकुमार शिंदे, नेताजी जाधव, गजानन ढगे, संगाप्पा स्वामी, संतोष सोनवणे, योगेश शर्मा, शिरीषकुमार शेरखाने, भुजंग कांबळे, शरद पवार, खंडेराव देडे, सगीर मोमीन, इस्माईल शेख, मुस्तफा शेख, चंद्रकांत पाटील, राम रोडगे, समद शेख , प्रकाश कंकाळ, महेश गाडेकर, रामप्रसाद काबरा, मनीष हजारे, राघवेंद्र देबडवार, रवि बिजलवाड, द्रोणाचार्य कोळी, मनोज पटवारी आदींसह उपस्थित पत्रकार बांधवांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय परळकर यांनी केले, सूत्रसंचलन लातूर जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर डिगोळे यांनी केले तर आभार लातूर जिल्हाध्यक्ष संजय राजुळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लातूर शहराध्यक्ष अमोल घायाळ, संस्थापक उपाध्यक्ष वामन अंकुश, संस्थापक कोषाध्यक्ष राजकुमार गुडाप्पे आदींसह लातूर जिल्हा साप्ताहिक पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले.
