विश्व शांततेसाठी साऱ्या विश्वाला बुद्ध हवा
कासार बालकुदा येथील राजगृह बुध्द विहारात बुध्दमूर्ती ची स्थापना
निलंगा /प्रतिनिधी: निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी राजगृह बुद्ध विहार येथे बुद्ध मूर्ती स्थापना करण्यात आली. लातूर जिल्ह्यातील भव्य आणि दिव्य बुद्ध विहार कासार बालकुंदा येथे निर्माण करण्यात आले आहे. यामध्येच एक सुवर्णयोग म्हणजे तथागत गौतम बुद्ध यांची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. ही मूर्ती अष्ट धातूची असून थायलंड येथून आणण्यात आली आहे. सकाळी ११ वाजता भंते सुमितजी नागसेन खरोसा, भंते धम्मसार किल्लारी व भंते सुमंगल कराळी यांच्या शुभहस्ते विधिवत पूजा करून बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली. बुद्ध व विहार पूर्ण करण्यासाठी माजी आमदार बस्वराज पाटील व आमदार अभिमन्यू पवार यांनी सहकार्य केले आहेत.
प्रथमता पंचशील ध्वजारोहण करण्यात आले त्यानंतर तथागत गौतम बुद्धाची रथावरती धम्म रॅली काढण्यात आली. त्यानंतर बुद्ध मूर्ती स्थापना झाल्यानंतर सर्व उपासक-उपासिकांना धम्मदेसना देण्यात आले. हे संपूर्ण झाल्याच्या नंतर भंते सुमितजी नागसेन, भंते धम्मसार, व भंते सुमंगल यांनी प्रमुख धम्मदेशना दिले. धम्मदेशना झाल्यानंतर नितीन पाटील आचार्य यांच्याकडून भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती.
कार्यक्रम प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक नितीन पाटील आचार्य, रंजीत कोकणे, पोलीस पोलीस पाटील संदीप पाटील, मारूती लोहार पत्रकार,फारूक फकीरावाले, दत्ता सारगे, राम कावले, सुभाष लातूरे, त्र्यंबक पाटील, गणेश पाटील, योगेश नायब, सहगावातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजीव गोपाळे, व्यंकट मधाळे, अशोक काळे, शिवराज गायकवाड, व्यंकट गोपाळे, माधव काळे, शिवराज गोपाळे, बिभीषन गायकवाड, विजय गोपाळे, गुरुनाथ गोपाळे, वीरेंद्र काळे, रवी गोपाळे, लक्ष्मण गायकवाड, मधाळे कमलाकर, आतिश काळे, कडाजी मधाळे, सुकवंत मधाळे, बाळू कांबळे, सुदाम मधाळे, रणजीत मधाळे, मुकेश गोपाळे, बाबुराव सूर्यवंशी, मधुकर गायकवाड, नामदेव गायकवाड, ज्ञानदेव गायकवाड, अनिल सूर्यवंशी, लखन गायकवाड, प्रविण मधाळे, सौ अनिता गायकवाड, सौ. रामदुलारी कार्तीका, गायकवाड गोपाळे, शितल मधाळे, रेखा गोपाळे, लक्ष्मी मधाळे, हारुबाई मधाळे यासह उपासक व उपासिका प्रयत्न केले.
