• Mon. Apr 28th, 2025

गृहमंत्री अमित शहाच्या वक्तव्या निषेधार्थ लातूर शहर वंचित कडून भव्य निदर्शने

Byjantaadmin

Dec 20, 2024

गृहमंत्री अमित शहाच्या वक्तव्या निषेधार्थ लातूर शहर वंचित कडून भव्य निदर्शने

लातूर

भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या देशाला सुंदर अशी राज्यघटना दिली, त्यात भारतातील सर्व नागरिकास सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज निर्माण करणे, तेथील सर्व नागरिकात सामाजिक, आर्थिक, न्याय, स्वातंत्र्य, समानता प्रस्थापित व्हावी अशी उदात्त धोरण होते. त्याबरोबरच देशातील सर्व नागरिकांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा मान-सन्मान, आदर , राष्ट्राची एकता आणि एकात्मता आश्वासन देणारी बंधुता निर्माण करणे हा मूळ उद्देश आहे.
परंतु ज्या भारतीय संविधानावर हा देश चालतो त्या देशात संसदीय लोकशाहीने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करून भर संसदेत देशाचे गृहमंत्री आर एस एस विचारधारेचे अमित शहा यांनी देशाचे घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहेब या महामानवा बद्दल द्वेशात्मक भावनेने जाणून-बजून अपमान केला. महामानवाला देशातील अनेक जाती धर्मातील लोक हे देवा समान मानतात त्यांचे विचार अनुसरण करतात त्यांना वंदन करतात आणि हेच अमित शहा यांच्या पोटात रुतत असल्याकारणाने संसदेत महापुरुषांच्या बद्दल अवमान कारक आणि केवळ जाती-जाती मध्ये धर्मा-धर्मामध्ये दंगली घडाव्या आणि एकमेका विषयी द्वेष निर्माण व्हावा म्हणून जाणूनबुजून असे वक्तव्य केल्याचे आहे. त्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडी लातूर शहराच्या वतीने आज गांधी चौक लातूर येथे तीव्र निदर्शने करण्यात आले. त्याने केलेल्या वक्तव्याबद्दल अमित शहा ने लवकरात लवकर माफी मागावी अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा या आंदोलना दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे लातूर शहराध्यक्ष सचिन अर्जुन गायकवाड यांनी प्रशासनाला दिला आहे.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा महासचिव संतोषभाऊ सूर्यवंशी, युवक प्रदेश सदस्य अमोल लांडगे, जिल्हा महासचिव रोहित सोमवंशी, शहराध्यक्ष सचिन अर्जुन गायकवाड,जिल्हा उपाध्यक्ष शेख खलील,विनोद खटके, डॉ. विजय अजणीकर, बौद्धाचार्य केशव कांबळे,जिल्हा सचिव प्रा. प्रशांत उघाडे सर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुरेश सूर्यवंशी, प्रचारक सय्यद सुफी साहब,युवक जिल्हा महासचिव नितीन गायकवाड, कामगार माथाडी जिल्हाध्यक्ष अमोल बनसोडे, लातूर ता.अध्यक्ष सुनील कांबळे, शहर महिला अध्यक्ष सुजाता अजनीकर, शहर महासचिव आकाश इंगळे,ब्लॅक पॅंथर संस्थापक अध्यक्ष अतुलजी गायकवाड, संस्थापक उपाध्यक्ष उषाताई धावारे, युवक शहराध्यक्ष महिंद्र बनसोडे, शहर सचिव दादासाहेब मस्के, शहर उपाध्यक्ष मनोज लेंढाणे,शहर सदस्य पठाण शरीफ, तालुका उपाध्यक्ष अशोक कांबळे, ॲड. उड्डाण सिंग,अरुण सूर्यवंशी, संजय सुरवसे, प्रसेनजीत कांबळे, शहर सल्लागार राहुल सूर्यवंशी, कमलाकर कवठेकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed