• Mon. Apr 28th, 2025

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७० फुट ऊंचीचा पुतळा,विलासराव देशमुख मार्ग दुसरा टप्पासाठी निधी उपलब्ध करुन दयावा

Byjantaadmin

Dec 20, 2024

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७० फुट ऊंचीचा पुतळा,
विलासराव देशमुख मार्ग दुसरा टप्पासाठी निधी उपलब्ध करुन दयावा
लातूर येथील जिल्हा रुग्णालय व विलासराव देशमुख वैदयकीय महाविदयालयाच्या
मदर ॲन्ड चाइल्ड रुग्णालयाची जागा त्वरीत उपलब्ध करुन दयावी
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांची विधानसभेत मागणी
महिलांसाठी मोफत सिटी बस प्रवास, नाट्यगृह, शादीखाना, शिवछत्रपती
ग्रंथालय, मराठी भाषा भवन यासाठीही निधीची मागणी

नागपूर ( प्रतिनिधी) : शुक्रवार २० डिंसेबर २४
लातूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क
येथे स्टॅच्यू ऑफ नॉलेज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ७० फुट
उंचीच्या पुतळा उभारणी तसेच शिवछत्रपती वाचनालय इमारतीची पुर्नबांधणी,
हुतात्मा स्मारक व मराठावाडा मुक्ती स्मारक स्तंभ परीसराचे सुशोभिकरण,
आदरणीय विलासराव देशमुख मार्गाचा दुसरा टप्पा यासह विविध प्रकल्पासाठी
त्वरीत निधी उपलब्ध करुन दयावा, त्याच बरोबर, कृषी महाविद्यालयाच्या
जागेवर लातूर जिल्हा रुग्णालय व विलासराव देशमुख शासकीय वैदयकीय
महाविदयालयाच्या वतीने पटेल चौक येथे उभारावयाच्या मदर ॲन्ड चाइल्ड
रुग्णालयाच्या जागेचा प्रश्न त्वरीत सोडवावा, अशी मागणी माजी मंत्री
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी आज विधानसभेत केली.

नागपूर येथे सुरू असलेल्या महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी
अधिवेशनादरम्यान आज नगर विकास व सार्वजनीक आरोग्य विभागाच्या पुरवणी
मागण्यावरील चर्चेत सहभागी होताना लातूर शहरासह व राज्यातील
महत्वाकांक्षी प्रकल्पा बाबत माजी मंत्री आमदार देशमुख यांनी आपली भुमिका
मांडून मागणी नोंदवली. विधीमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी
अधिवेशनादरम्यान शुक्रवारी विधानसभेत पुरवणी मागण्यावरील चर्चेत सहभागी
होतांना आमदार अमित देशमुख म्हणाले की, महिलांसाठी सिटीबस मधून मोफत
प्रवास योजना सुरू करणारी लातूर ही राज्यातील पहीली मनपा आहे. ही योजना
पूढे सुरू राहण्यासाठी राज्य शासनाने लातूर मनपाला पुरेसा निधी उपलब्ध
करुन दयावा. एसटी प्रवासात महीलांना सवलतीची योजना लागू केलेली आहे त्या
धर्तीवर राज्यातील सर्व महानगरात महीलांना सिटीबस मधून मोफत प्रवास योजना
लागू करावी.
लातूर शहरात उभारण्यात येणाऱ्या स्टॅच्यू ऑफ नॉलेज भारतरत्न डॉ.
बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० फुट उंचीच्या पुतळा उभारणीसाठी व परिसर
विकासासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून द्यावा. लातूर येथील विलासराव
देशमुख शासकीय महाविद्यालयाच्या वतीने लातूर शहरातील पटेल चौक येथे
उभारावयाच्या मदर अँड चाइल्ड रुग्णालयासाठी नगर विकास विभागाची जागा
प्रति एक रुपया चौरस मीटर एवढ्या नाममात्र भाड्याने उपलब्ध करून द्यावी.
लातूर शहरातील मुख्य रस्त्याला समांतर पद्धतीने बांधण्यात येत असलेल्या
विलासराव देशमुख मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामासाठी निधी उपलब्ध
करून द्यावा. लातूर शहरात उभारण्यात येत असलेल्या नाट्यगृह
बांधकामासाठीचा उर्वरित निधी उपलब्ध करून द्यावा. लातूर शहरात मनपाच्या
वतीने एका शादीखानाचे बांधकाम पूर्ण केले आहे. दुसऱ्या शादीखानाचे
बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे, त्या शादीखाना इमारतीसाठी आवश्यक असणारा
निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा. लातूर शहरात मनपाच्या वतीने मागच्या
अनेक वर्षापासून शिवछत्रपती ग्रंथालय चालवण्यात येत आहे, आता या
ग्रंथालयाची इमारत जुनी झाली असून त्या इमारतीची अदययावत पध्दतीने उभारणी
आवश्यक झाली आहे, त्यामुळे शासनाच्या वतीने राज्यभरात प्रत्येक
जिल्हयाच्या ठिकाणी मराठी भाषा भवन उभारण्यात येणार आहे, त्यासाठीही
लातूर येथे निधी उपलब्ध करून देण्यात यावा आदी मागण्याही यावेळी आमदार
देशमुख यांनी केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed