निलंगा शहरात काँग्रेसचे उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचार्थ भव्य रॅली मतदारांशी भेटी गाठी घेत साधले संवाद
नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
निलंगा ( प्रतिनिधी ) निलंगा विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचारार्थ आज दि 15 नोव्हेंबर रोजी निलंगा शहरात वाजत गाजत घोषणाबाजी करत भव्य रॅली काढून मतदारांशी संवाद साधला . शहरातील या रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसत होता.
ही रॅली हडगा मोड शिवाजी नगर येथील देवीचे दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आली. शिवाजी नगर ते अडत मार्केट , बँक कॉलनी , पांचाळ कॉलनी जिजाऊ चौक , गांधीनगर , दापका वेस , निळकंठेश्वर मंदिरात पुष्पहार अर्पण करून दर्शन घेऊन सावता माळी चौक मार्गे पिरपाशा दर्गा दर्शन , जुने पोलीस स्टेशन , औरंगपुरा , अनंदमुनी चौक , दत्तनगर , दत्तनगर कॉर्नर ते शिवाजी चौकात आल्यानंतर उमेदवार अभय साळुंके यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून रॅलीची सांगत करण्यात आली.
यावेळी काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभय साळुंके, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष विजयकुमार पाटील , शहराध्यक्ष अजित नाईकवाडे , माजी सभापती अजित माने, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख हरिभाऊ सगरे,तालुका प्रमुख अविनाश रेशमे,काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर पाटील ,काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाअध्यक्ष लाला पटेल, अंबादास जाधव , पंकज शेळके , चेअरमन गंगाधर चव्हाण , माजी सरपंच शकील पटेल , अजित निंबाळकर ,महेश देशमुख , राष्ट्रवादीचे इस्माईल लदाफ , विलास सूर्यवंशी , अजगर अन्सारी , भास्कर सलघंटे , विलास लोभे , अशोक शेटगार , चक्रधर शेळके , गोविंद सूर्यवंशी , तुराब बागवान , गिरीश पात्रे , मुजीब सौदागर , धनाजी चांदुरे , देविदास सूर्यवंशी , विरभद्र आग्रे , तगारे आदीसह काँग्रेस महाविकास आघाडीचे पदाधिकारी , कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विशेष म्हणजे काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या निलंगा शहरातील रॅलीमध्ये बालाजी मोहनराव गाडीवान हे एका पायाने दिव्यांग असूनही हातामध्ये दोन कुबड्या घेऊन रॅलीत सहभागी होऊन रॅलीला चांगलीच रंगत भरली. त्यांचा रॅलीतील हा सहभाग पाहता काँग्रेसच्या उमेदवारास जनतेचा उत्स्फूर्त सहभाग असल्याचे दिसते. यामुळे ही निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असली तरी अखेर जनतेनेच निवडणूक हातात घेतली असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
