निराधार योजनेच्या जिल्हा बँकेमार्फत घरपोच पगारी, महिला, ज्येष्ठ नागरिकांनी दीपशिखा धिरज देशमुखांना दिले आशीर्वाद
लोकनेते विलासरावजी देशमुख यांच्या कार्याची झलक धिरज देशमुख यांच्या मध्ये….
लातूर /प्रतिनिधी – विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. लातूर ग्रामीण मतदारसंघांचे आमदार धिरज विलासराव देशमुख हे दुसऱ्यांदा निवडणूकीच्या आखाड्यात उतरले आहेत. आमदार म्हणून धिरज देशमुख यांनी केलेल्या विकासकामाच्या जोरावर त्यांना सर्वच क्षेत्रातून पाठिंबा मिळतचं आहे. शिवाय जिल्हा बँकेचे चेअरमन म्हणून धिरज देशमुख यांनी महिला आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या विविध योजनांचे पैसे गावखेड्यात घरपोच देण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या या निर्णयाचे कौतुक करत शिवूर येथील वृद्ध, निराधार महिलांनी धिरज देशमुख यांना निवडणुकीसाठी यशवंत होण्याचे आशीर्वाद दिले.ज्या पद्धतीने लोकनेते विलासरावजी देशमुख यांचे कार्य होते त्याच कार्याची झलक आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या मध्ये दिसते अशा भावना नागरिकां मधून व्यक्त केल्या जात आहेत.
नुकतेच दीपशिखा धिरज देशमुख या शिवूर येथे प्रचार दौऱ्यावर गेल्या होत्या.त्यांच्या सोबत मुलगी दिवीयाना देखील होत्या. त्यावेळी पदयात्रेदरम्यान रस्त्यात काही वृद्ध महिलांनी दीपशिखा देशमुख यांची भेट घेऊन जिल्हा बँकेचे आमदार धिरज भैय्या देशमुख यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी काही वृद्ध महिलांनी जिल्हा बँकेच्या माध्यमातून निराधार योजनेचे पैसे नियमितपणे घरपोच होत असून आमचा त्रास दूर केला असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी या महिलांनी दीपशिखा देशमुख आणि दिवीयांना यांचे औक्षण करून त्यांना आशीर्वाद दिले. तसेच या ज्येष्ठ महिलांनी धिरज देशमुख यांचे कौतुक करून त्यांना या निवडणुकीसाठी शुभाशीर्वाद दिले. यावेळी गावातील या वयस्कर महिलांच्या भावना पाहून दीपशिखा देशमुख या देखील भारावून गेल्या.
धिरज देशमुख यांनी जिल्हा बँकेच्या वतीने शेतकरी, कामगार, युवक आणि महिलांच्या आर्थिक प्रगतीचे धोरण समोर ठेऊन विविध योजना सुरु केल्या आहेत. या मध्ये त्यांनी निराधार महिलासांठी संजय गांधी निराधार योजनेतून मिळणारी सहाय्यता निधी, श्रावण बाळ योजनेतून होणाऱ्या पगारीची रक्कम थेट लाभार्थी व्यक्तीच्या हातात घरपोच करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक ही आपलं वाहन आणि कर्मचारी गावोगावी पाठवून रक्कम वितरित करतात.
गावखेड्यात अनेकदा निराधार महिला, ज्येष्ठ नागरिकांना सरकारी योजनेतून मिळणारे पैसे बँक खात्यातून काढून घेण्यासाठी वेळ उपलब्ध होत नाही. बँकेत जाण्यासाठी कोणाची मदत मिळत नाही किंवा इतर तांत्रिक बाबींमुळे पैसे काढायला जाणे शक्य होत नाही. काही वेळा पैशांची गरज असल्याने वृद्ध महिलांना बँकेत जाण्यासाठी गावखेड्यातून शहरी भागाची पायपीट करावी लागते. या सर्व गैरसोयी टाळण्यासाठी धिरज देशमुख यांनी या लाभार्थ्यांचे पैसे थेट घरपोच देण्याचा कौतुकास्पद निर्णय घेतला. त्याचा फायदा आज शेकडो निराधार जेष्ठ नागरिकांना होत आहे.
