• Tue. Apr 29th, 2025

मतदानरुपी आशीर्वाद देऊन शेतकऱ्यांच्या लेकराला पदरात घ्या अभय साळुंके यांची भावनिक साद

Byjantaadmin

Nov 14, 2024

मतदानरुपी आशीर्वाद देऊन शेतकऱ्यांच्या लेकराला पदरात घ्या अभय साळुंके यांची भावनिक साद 

युवकांचा मोठा प्रतिसाद केळगावच्या सभेला प्रचंड गर्दी

      निलंगा ( प्रतिनिधी ) ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे.गेल्या वीस वर्षात निलंगा तालुक्यात कसल्याच प्रकारचा विकास झाला नाही. जनता दडपणामध्ये आहे. या गरीब शेतकऱ्याच्या मुलाला काँग्रेस पक्षाने तिकीट दिले आहे. निलंगा तालुक्यात रोजगार उपलब्ध करून तालुक्याची शान वाढविण्यासाठी तुम्ही साथ द्या गरिबाच्या लेकराला मतदानरूपी आशीर्वाद देऊन पदरात घ्या अशी भावनिक साद काँग्रेस महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभय साळुंके यांनी केले.

    ते निलंगा तालुक्यातील केळगाव येथे मतदारांशी संवाद साधत असताना बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे गोपाळ राठोडकर उपस्थित होते .तर मंचावर डॉ अरविंद भातांब्रे , अंबादास जाधव , माजी उपसभापती बाबुराव सूर्यवंशी,माजी सरपंच शकील पांढरे,नूर पटेल,समद पांढरे ,फारुक पांढरे,नामदेव परळे,जोहर पांढरे,कुमार पाटील,सूर्यकांत सूर्यवंशी,चक्रधर शेळके,शकील पटेल,वामन जाधव ,प्रकाश सूर्यवंशी,किसन पाटील हे उपस्थित होते.

    पुढे बोलतांना उमेदवार अभय साळुंके म्हणाले की , केळगाव येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी विद्यमान आमदारांनी खोटे आश्वासन देऊन समाजाची दिशाभूल केली आहे. फक्त आश्वासन दिले मात्र पुतळा अद्याप बसवला नाही. तसेच केळगावच्या अंतर्गत रस्त्याची कामे झाली नाहीत मला भरभरुन आशीर्वाद द्या मी अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्याचे काम करेन असे अभय साळुंके यांनी आश्वत केले . सभेस नागरिकांची प्रचंड गर्दी होती.तर यावेळी युवकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला.

यावेळी गोपाळ राठोडकर ,माजी उपसभापती बाबुराव सूर्यवंशी ,किसन पाटील , माजी उपसरपंच बाबुराव राठोड ,अमर चव्हाण ,फारुक पांढरे,रावण कांबळे,जोहर पांढरे,हुजुर मुजावर ,प्रताप पाटील,सूर्यकांत सूर्यवंशी,प्रकाश सूर्यवंशी,रफिक पांढरे,जीलानी मुजावर,महंमद दाळींबकर, सत्तार पटेल,मुजीब दाळिंबकर,मोहसीन पांढरे,भिकाजी कांबळे,निसार पांढरे, नारायण मुंजाळे,मोहसीन पटेल,बालाजी पाटील, शेषराव राठोडकर,चांद मुजावर,इनुस पठाण,गंगाधर परळे आदीसह काँग्रेस पदाधिकारी , कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन जगन सूर्यवंशी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed