• Tue. Apr 29th, 2025

लातूरकर विकास करणाऱ्यांच्या पाठीशी, आमदार अमित देशमुख यांचा विश्वास

Byjantaadmin

Nov 13, 2024

लातूरकर विकास करणाऱ्यांच्या पाठीशी, आमदार अमित देशमुख यांचा विश्वास
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
यांच्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद
काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी परीसर दुमदूमून गेला



लातूर (प्रतिनीधी) : बुधवार दि. १३ नोव्हेबर २४
ही निवडणूक महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, अस्मितेची निवडणूक आहे.
तुमच्या आशीर्वादाने आपल्याला विजयाचा चौकार मारायचा आहे. आपण विकास
करणाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, असे आवाहन काँग्रेस-महाविकास
आघाडीचे लातूर शहर मतदारसंघातील उमेदवार माजी मंत्री आमदार अमित विलासराव
देशमुख यांनी केले.

लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी जनसंपर्क अभियाना अंतर्गत बुधवार बुधवा दि़. १३
नोव्हेंबर रोजी सांयकाळी शहरातील प्रभाग ९, १३, १४, व १५ प्रभागांतून भव्य
प्रचार रॅली काढण्यात आली़ यावेळी ते बोलत होते.

या रॅलीला या चारही प्रभागांतील मतदारांनी
उस्फुर्त प्रतिसाद दिला. पुरुष महिला युवती मोठया प्रमाणात या रॅलीत
सहभागी झाले होते. महीलांची, युवकांची संख्या लक्षणिय होती़
प्रभाग क्रमांक. १३ मध्ये संविधान चौक येथे माजी मंत्री आमदार अमित
विलासराव देशमुख यांचे आगमन होताच फटाक्यांच्या आतषबाजीत त्यांचे स्वागत
करण्यात आले़
तेथून प्रचार रॅलीस सुरुवात झाली. काँग्रेस पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी
परीसर दुमदूमून गेला. रॅली मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी रांगोळी
काढून मार्ग सुशोभित केला होता.,अनेक घरांच्या छतावरुन रॅलीवर
पुष्पवृष्टी करण्यात आली, हातात फलक, झेडे घेऊन मोठया संख्येने
पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक सहभागी झाले होते.  विरोधी पक्षाने १५
दिवसांत उमेदवार आयात केला.

या निवडणुकीत लातूरकरांना गांभीर्याने विचार करायचा आहे. ही
महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची, महाराष्ट्राच्या अस्मितेची निवडणूक आहे.
या निवडणुकीत तुमच्या आशीर्वादाने आपल्याला विजयाचा चौकार मारायचा आहे.
प्रत्येकाने मतदान करावे, कोणीही मतदानापासून वंचित राहू नये. विरोधी
पक्षाकडे उमेदवार नव्हता. त्यांनी हा लादलेला उमदेवार १५ दिवसांत आयात
केला आहे. पण लातूरकर जनता सूज्ञ आहे. ते विकास करणाऱ्यांच्या पाठीशी
खंबीरपणे उभे राहतील, असे सांगताना आमदार अमित देशमुख यांनी येत्या २०
तारखेला बहुमताने विजयी करण्याचे मतदारांना आवाहन केले.

संवीधान चौकापासुन सुरुवात होवून खाडगाव रोड, हिप्परकर कॉम्पलेक्स
त्यानंतर प्रभाग क्रमांक १४ मध्ये गणेश चौक पासुन सुरुवात झाली व महसुल
कॉलनी, जुना औसा रोड, श्रीराम चौक,  दादाजी कोंडदेव नगर, केदारनाथ
शाळेजवळून प्रभाग क्रमांक १५ मध्ये लगस्कर बिल्डींग पासुन सुरुवात झाली
ते देशमुख हॉस्पिटल, आदर्श कॉलनी कमान कम्युनिटी हॉल, नारायण नगर,
सिताराम चौक, अष्टविनायक मंदीर, शिवनगर, शिवनगर, ठाकरे चौक येथून प्रभाग
क्रमांक ९ मधील मिनी मार्केट, कामदार रोड, बसवेश्वर कॉलेज, मनपा मागील
बाजुने, विलासराव देशमुख पार्क, शिवनेरी गेट, येथे सदरील रॅलीचा समारोप
करण्यात आला.

या रॅलीमध्ये युवकांचा सहभाग लक्षणिय होता़ ‘महाविकास आघाडीचा विजय असो’,
‘अमित देशमुख तूम आगे बढो हम तुम्हारे साथ है’,  अशा घोषांचा संपूर्ण
परिसरात
आवाज घुमला़ महिला, युवती, पुरुषही मोठ्या संख्येने प्रचार रॅलीत सहभागी
झाले होते़.

यावेळी पदाधिकारी, नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते
—-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed