सिमाभागातील बिदरच्या खासदारांची प्रचारात उडी… अभय साळुंके सदैव तत्पर राहणार-खासदार सागर खंड्रे
निलंगा : महाराष्ट्रात व कर्नाटक राज्याच्या सिमेवर असलेल्या निलंगा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अभय साळुंके यांच्या प्रचारासाठी शेजारच्या राज्याचे तरुण खासदार सागर खंड्रे यांनी प्रचार करत निवडुंग देण्याची साद आपल्या पाहुण्याला घातली.
सिमाभागात लिंगायत समाज मोठ्या प्रमाणात आहेत . शिवाय यांचे मते ही वैचारिक असल्याने त्यांचे मतपरिवर्तन व्हावे या उद्देशाने बिदरचे खासदार सागर खंड्रे हे सिमाभागातील औराद शहाजनी, निलंगा,निटुर , वलांडी,देवणी येथिल समाजबांधवाशी डोअर टु डोअर भेट देवुन हितगुज केली .सागर खंड्रे यांचे देवणी हे आजोळ असुन त्यांचा व खंड्रे परिवाराचा या भागात चांगला प्रभाव आहे.त्यांच्या निवडणुकीत अभय साळुंके यांनी कन्नड मधुन भाषण करुन उपस्थितांची मने जिंकली होती.त्याची परतफेड व शिवाय एक लढाऊ उमेदवार म्हणून अभय साळुंके यांच्या पाठीशी मतदारांनी ठाम उभे राहुन काँग्रेसचे हात बळकट करावे अशी साद आपल्या सग्या सोयरे यांना घातली.त्याच्या भेटी गाठी दौऱ्यात सेनेचे तालुकाप्रमुख अविनाश रेश्मे ,व अंबादास जाधव यांनी पुढाकार घेतला.
साकोळच्या सभेत फोनवरून संभाषण…..
अभय साळुंके यांच्या प्रचार सभेत सागर खंड्रे हे साकोळ येथे उपस्थित राहणार होते.पण अचानक काम आल्याने ते गाठी भेटी दौरा करून परतले पण आपल्या भ्रमणध्वनी वरुन साकोळकरांशी संभाषण करत साळुंके यांना निवडून देण्याचे आवाहन केले
