• Tue. Apr 29th, 2025

जनसंपर्क अभियाना अंतर्गत महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारअमित विलासराव देशमुख यांची प्रचारार्थ पदयात्रा, मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

Byjantaadmin

Nov 11, 2024

जनसंपर्क अभियाना अंतर्गत महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार
अमित विलासराव देशमुख यांची प्रचारार्थ पदयात्रा, मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद

लातूर (प्रतिनीधी) : लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी जनसंपर्क अभियाना अंतर्गत शनिवारी
सांयकाळी शहरातील प्रभाग १०, ११ व १२ येथे भव्य प्रचार रॅली काढली या
रॅलीला शहरवाशीयांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. पुरुष महिला, युवक, युवती
मोठया प्रमाणात या रॅलीत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी नागरिकाकडून
फटाक्याची आतषबाजी आणि पुष्पवृ्ष्टी करण्यात आली.
सांयकाळी ६ वाजता लातूर शहराच्या ५ नंबर चौकातून लातूर शहर विधानसभा
मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव
देशमुख यांच्या प्रचार रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीच्या प्रारंभीच
हजारोंच्या संख्येत तिरंगी झेंडे घेऊन सहभागी झाले होते.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या रॅलीची सुरुवात होताच काँग्रेस
पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी परीसर दुमदूमून गेला. रॅली मार्गावर अनेक
ठिकाणी नागरिकांनी रांगोळी काढून मार्ग सुशोभित केला होता., अनेक
घरांच्या छतावरुन रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, हातात फलक, झेडे घेऊन
मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक सहभागी झाले होते. ही भव्य
रॅली एकमत चौक (5 नं.चौक) चौधरी नगर – संविधान चौक – महाराष्ट्र हाऊसींग
सोसायटीपासुन अग्रोया नगर – पंचशिल चौक – बोधी चौक ते साई मंदिर – गगन
विहार चौक – विठाई सुपर मार्केट डावी बाजू मरे यांच्‍या घरापासून श्याम
नगर – अमलपुरा – बजरंग चौक – जिजामाता चौक – भैरवनाथ मंदिर मार्गे
बाजीराव चौक – पाणंद रोड मार्गे सुग्रे – किरणा दुकानासमोरून एल.आय.सी.
ऑफिस सदरील रॅलीचा समारोप करण्यात आला.
यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे लातूर शहर विधानसभा प्रभारी आमदार
फुरखान अहमद, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी
महापौर दीपक सूळ, सूर्यकांत कातळे, राम कोंबडे, सतीश साळुंखे, गोटू यादव,
कमलाताई शहापुरे, सचिन पाटील, डॉक्टर बालाजी साळुंखे, बालाजी मुस्कावाड,
सुधाकर साळुंखे, संजय ओहळ, विकास वाघमारे, बबन देशमुख, मोहन सुरवसे,
वेंकटेश पुरी, राम स्वामी, भालचंद्र सोनकांबळे, पवन सोलंकर, अकबर माडजे,
आकाश भगत, रत्नदीप अजनीकर, कांचन अजनीकर, कल्पनाताई मोरे, सुमन चव्हाण,
सुकेश गोडबोले, हरीओम भगत, व्यंकटराव शिंदे, जीवन सुरवसे, कुणाल येळीकर,
महादेव बरुरे, दीपक राठोड, सायरा पठाण, अनिता कांबळे, लता काळे, शोभा
ओहळ, मंदाकिनी शिखरे आदीसह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार
पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शेतकरी कामगार पक्ष आम आदमी
पार्टी महाविकास आघाडीचे माजी नगरसेवक पदाधिकारी नागरिक महिला मोठ्या
संख्येने उपस्थित होत्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed