जनसंपर्क अभियाना अंतर्गत महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव देशमुख यांची प्रचारार्थ पदयात्रा, मतदारांचा उस्फुर्त प्रतिसाद
लातूर (प्रतिनीधी) : लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांनी जनसंपर्क अभियाना अंतर्गत शनिवारी
सांयकाळी शहरातील प्रभाग १०, ११ व १२ येथे भव्य प्रचार रॅली काढली या
रॅलीला शहरवाशीयांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. पुरुष महिला, युवक, युवती
मोठया प्रमाणात या रॅलीत सहभागी झाले होते. ठिकठिकाणी नागरिकाकडून
फटाक्याची आतषबाजी आणि पुष्पवृ्ष्टी करण्यात आली.
सांयकाळी ६ वाजता लातूर शहराच्या ५ नंबर चौकातून लातूर शहर विधानसभा
मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अमित विलासराव
देशमुख यांच्या प्रचार रॅलीला प्रारंभ झाला. रॅलीच्या प्रारंभीच
हजारोंच्या संख्येत तिरंगी झेंडे घेऊन सहभागी झाले होते.
लातूर शहर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे अधिकृत
उमेदवार अमित विलासराव देशमुख यांच्या रॅलीची सुरुवात होताच काँग्रेस
पक्षाच्या विजयाच्या घोषणांनी परीसर दुमदूमून गेला. रॅली मार्गावर अनेक
ठिकाणी नागरिकांनी रांगोळी काढून मार्ग सुशोभित केला होता., अनेक
घरांच्या छतावरुन रॅलीवर पुष्पवृष्टी करण्यात आली, हातात फलक, झेडे घेऊन
मोठया संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते नागरीक सहभागी झाले होते. ही भव्य
रॅली एकमत चौक (5 नं.चौक) चौधरी नगर – संविधान चौक – महाराष्ट्र हाऊसींग
सोसायटीपासुन अग्रोया नगर – पंचशिल चौक – बोधी चौक ते साई मंदिर – गगन
विहार चौक – विठाई सुपर मार्केट डावी बाजू मरे यांच्या घरापासून श्याम
नगर – अमलपुरा – बजरंग चौक – जिजामाता चौक – भैरवनाथ मंदिर मार्गे
बाजीराव चौक – पाणंद रोड मार्गे सुग्रे – किरणा दुकानासमोरून एल.आय.सी.
ऑफिस सदरील रॅलीचा समारोप करण्यात आला.
