- डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर
कासारगाव व हणमंतवाडी येथील पदयात्रांना उत्स्फूर्त प्रतिसाद
न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्यांच्या अपेक्षापूर्तीसाठीच निवडणुकीच्या आखाड्यात
– डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर
लातूर /प्रतिनिधी:वर्षानुवर्ष अन्याय सहन करणाऱ्या आणि न्यायाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या सामान्य नागरिक व मतदारांच्या अपेक्षापूर्तीसाठी आपण निवडणुकीच्या आखाड्यात उतरलो असल्याचे मत लातूर शहर मतदारसंघातील भाजपा महायुतीच्या उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले.डॉ.अर्चनाताई पाटील यांनी गुरुवारी सकाळी कासारगाव व हणमंतवाडी येथे पदयात्रा काढून नागरिकांशी संवाद साधला.
दोन्ही गावात ताईंचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.
ठिकठिकाणी पुष्पहार घालून महिलांनी त्यांचा सत्कार केला. औक्षण करून निवडणुकीतील विजयासाठी शुभेच्छा दिल्या. अर्चनाताईंनी पदयात्रेदरम्यान कासारगाव येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन केले.गावातील बिरुदेवाचे दर्शनही त्यांनी घेतले. हणमंतवाडी येथे जगदंबा मातेचे त्यांनी दर्शन घेतले.
पदयात्रेदरम्यान ताईंनी महिलांसोबतच गावातील वृद्धांशी आवर्जून संवाद साधला. शासकीय योजनांचा लाभ मिळतोय की नाही ? याची माहिती जाणून घेतली.विविध योजना त्यांना समजावून सांगितल्या.आजारी असणाऱ्या वृद्धांची आस्थेवाईकपणे चौकशी करत त्यांच्यावर सुरू असणाऱ्या उपचारांची माहितीही डॉ. अर्चनाताई पाटील यांनी घेतली.
ताईंच्या पदयात्रेत गावातील अबालवृद्ध सहभागी झाले. डॉ.
अर्चनाताईंची संवादशैली, त्यांच्याकडून मिळणारी आदरयुक्त वागणूक पाहून गावातील नागरिक भारावून गेले.
ताईंसमवेत भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर,शहर जिल्हा सरचिटणीस ॲड.दिग्विजय काथवटे,महिला मोर्चाच्या शहराध्यक्ष रागिनीताई यादव, मीनाताई गायकवाड,शिरीष कुलकर्णी,प्रविण सावंत, लालासाहेब देशमुख,शिवसेना शहर प्रमुख दिनेश बोरा, श्रीनिवास लांडगे,चंद्रकांत शिंदे,
संदीप जाधव,कासारगाव मंडलाध्यक्ष प्रेम मोहिते,सचिन मोहिते,पांडुरंग मामडगे, कृष्णा केळे,निलेश मोहिते,अनिल मोहिते,पृथ्वीराज मोहिते, नरेंद्र मोहिते यांची उपस्थिती होती.
हणमंतवाडी येथे कृष्णा पाटील,बापू पाटील,मारुती पाटील,योगेश शिंदे,विशाल लोंढे, महादेव कांबळे, दिगंबर धोपटे, राहुल आलुरे यांच्यासह असंख्य नागरिक,पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.
