• Wed. Aug 6th, 2025

सिकंदरपुरच्या उपसरपंचासह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

Byjantaadmin

Nov 9, 2024

सिकंदरपुरच्या उपसरपंचासह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

अर्चनाताईंच्या उपस्थितीत काँग्रेसला खिंडार

लातूर / प्रतिनिधी : भाजपाच्या विकासात्मक धोरणवर विश्वास ठेवून शाहुमहाराज मंडलाध्यक्ष गोपाळ वांगे यांच्या पुढाकारातून सिकंदरपुरचे उपसरपंच पिराजी ईटकर यांच्यासह काँग्रेस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रमुख उपस्थितीतभाजपात प्रवेश केला.यामुळे काँग्रेसला खिंडार पडले.
उपसरपंच पिराजी ईटकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे भाजपाची शक्ती वाढून निवडणुकीत अधिकचे बळ मिळाले असल्याचे मत डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी व्यक्त केले.भाजपा हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे.सर्वांचा विकास करणारा पक्ष आहे.या पक्षात राष्ट्र प्रथम ही भावना आहे.याच भावनेतून वरिष्ठ नेते,पदाधिकारी व कार्यकर्ते काम करतात. त्यामुळे देशाच्या विकासाला गती मिळाली आहे.म्हणूनच देशभरात व लातुरमध्येही भाजपाला वाढते पाठबळ मिळत असल्याचे डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी यावेळी सांगितले.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर यांच्या प्रचारा निमित्त सिकंदरपुर येथे पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी हा पक्ष प्रवेश कार्यक्रम झाला.
यावेळी शिवसिंह शिसोदिया, शिवसेना शहरप्रमुख दिनेश बोरा, शिवसेना समन्वयक दीपक बडगिरे,चंद्रकांत शिंदे,संदीप जाधव,श्रीनिवास लांडगे, लालासाहेब देशमुख,सुनिल होनराव,बुथप्रमुख अमर पाटील, दत्ता गंभीरे,योगेश गंभीरे, अभिषेक गंभीरे,अभिजीत गंभीरे,पृथ्वीसिंह बायस, माणिकराव आलुरे आदी कार्यकर्ते,पदाधिकारी व सिकंदपूर ग्रामस्थ मोठ्या संख्येने पदयात्रेत सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *