वाढती महागाई ही महिलांसाठी चिंतेची बाब सौ.दीपशिखाताई धिरज देशमुख यांचे प्रतिपादन
लातूर :– सध्या सगळीकडे महागाई प्रचंड वाढली आहे. अशा परिस्थितीत सर्वांना दैनंदिन खर्च भागवणे कठीण जात आहे. विशेषतः महिलांना महिन्याचा खर्च भागवताना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी ज्या काही वस्तू आवश्यक असतात त्यामध्ये झालेली वाढ ही चिंतेची बाब आहे. यातून मार्ग काढायचा असेल तर महाविकास आघाडी काँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आणल्याशिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन सौ.दीपशिखाताई धिरज देशमुख यांनी केले.
विधानसभा निवडणूक – २०२४ लातूर ग्रामीण मधील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ लातूर तालुक्यातील शिऊर,भोयरा येथील प्रचार पदयात्रेदरम्यान त्या बोलत होत्या.यावेळी पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी आपल्या भागाचा विकास करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले आहेत. यापुढे देखील अधिक जोमाने काम करण्यासाठी मतदानरूपी आशीर्वाद त्यांना द्यावा असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले. गावातील पदयात्रेत विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात दीपशिखाताई धिरज देशमुख यांचे स्वागत करून ग्रामस्थांनी पाठिंबा दिला.
