विकासाच्या जोरावर आ अभिमन्यू पवार यांचा विजय निश्चित – पाशा पटेल…
औसा – आ अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामातून मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलून टाकला असून त्याच्या या कामीची पावती म्हणून त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला आहे.विकासाच्या जोरावर त्यांचा विजय निश्चित आहे तर महाराष्ट्रात अभिमन्यू पवार यांची जागा सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणायची जबाबदारी मतदारांची असून मतदार हि जागा सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणतील असा विश्वास मला असल्याचा विश्वास राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी व्यक्त केला आहे. ते शनिवारी औसा येथे भाजपचे जिल्हा प्रभारी संतोषअप्पा मुक्ता यांच्या संतोष सुभाष मुक्ता संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
यावेळी पाशा पटेल म्हणाले की कामाचा माणूस या भागाचा आमदार झाल्यास या भागाचे प्रश्न सुटतील या भागातील जनतेला न्याय मिळेल या भावनेने औशाची जागा मी अभिमन्यू पवार यांना सोडली आणि माझा तो विश्वास त्यांनी सार्थ करून दाखवत या भागात कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून या भागाचा कायापालट करून दाखविला आहे. आ अभिमन्यू पवार यांनी राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजना मतदारसंघात राबविल्या आहेत. त्याचा फायदा जनतेला होत असल्याचे सांगून केंद्र सरकारच्या वतीने लोकहिताच्या योजना सुरू असून केंद्र सरकार जनतेच्या हितासाठी काम करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी भाजपाचे जिल्हा प्रभारी संतोषअप्पा मुक्ता यांनी आ अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघात केलेल्या विकास कामांचा उल्लेख करीत या विकासाला आणखी गती देण्यासाठी आ अभिमन्यू पवारांच्या पाठीशी जनतेने एकजुटीने उभे राहावे असे आवाहन केले.यावेळी भाजपचे जेष्ठ नेते सुशीलदादा बाजपाई यांच्या हस्ते संपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी आमदार अभिमन्यू पवार, भाजपचे जिल्हा प्रभारी सुभाष मुक्ता, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव,माजी नगरसेवक संगमेश्वर ठेसे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रदीप मोरे, शिवसेनेचे शहरप्रमुख बंडू कोद्रे, औसा शहर अध्यक्ष सुनील उटगे ,कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, उपसभापती प्रा भिमाशंकर राचट्टे , भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष किरण उटगे, संगायो समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे, संजय कुलकर्णी,भाजप महिला अध्यक्षा गोकर्णा मोरे, शहराध्यक्षा जयश्री घोडके, कासारसिरसी मंडळाचे अध्यक्षा कविता गोरे आदी उपस्थित होते.
