निलंगा विधानसभेसाठी १३ उमेदवार रिंगणात तर ०९ जणांची माघार..
निलंगा-निलंगा विधानसभा मतदार संघ निवडणूक २०२४ करिता होत असलेल्या निवडणुकी करिता आज दिनांक ०४ नोव्हेंबर २०२४ रोजी ०९ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले तर १३ उमेदवारांनी निवडणुकी करिता आपली उमेदवारी कायम ठेवली आहे.अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके यांनी दिली.
आपली उमेदवारी कायम ठेवलेल्या उमेदवारांना निवडणूक चिन्ह वाटप करण्यात आले.ते पुढील प्रमाणे
१)अभय सतीश साळुंके (काँग्रेस) चिन्ह (हात)
२)कांबळे ज्ञानेश्वर साधू (बसपा) हत्ती
३) संभाजी दिलीपराव पाटील – निलंगेकर (भाजपा) चिन्ह (कमळ )
४)आकाश प्रकाश पाटील (राष्ट्रीय मराठा पार्टी) चिन्ह (फुलकोबी)
५)नागनाथ रामराव बोडके (राष्ट्रीय समाज पक्ष)चिन्ह (शिट्टी)
६)सौ.मंजू हिरालाल निंबाळकर (वंचीत बहुजन अघाडी)चिन्ह (गॅस सिलेंडर)
७) हणमंत धनुरे (प्रहार जनशक्ती पक्ष)चिन्ह(बॅट)
८)अनवर हुसेन मैनोद्दीन सय्यद (अपक्ष)चिन्ह (कपाट)
९)दत्तात्रय भानुदास सुर्यवंशी (अपक्ष)चिन्ह (कॅटली)
१०) दत्तात्रय विश्वनाथ सुर्यवंशी(अपक्ष)चिन्ह(एअर कंडीशनर)
११)निळकंठ गोविंदराव बिरादार(अपक्ष)चिन्ह(ऊस – शेतकरी)
१२)फयाजमिया पाशामियाँ शेख (अपक्ष)चिन्ह(सफरचंद)
१३)महेबूबपाशा खुर्शीद अहेमद मुल्ला (अपक्ष) चिन्ह (ऑटोरिक्षा)
हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
*याशिवाय उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलेल्या उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे ..*
१)अशोक शिवाजीराव पाटील- निलंगेकर
२)ईश्वर वसंतराव गायकवाड
३)अंबादास सुग्रीव जाधव
४)कालिदास शामराव माने
५) रेशमे लिंबनप्पा विश्वनाथअप्पा
६)विनायक विश्वनाथराव बगदुरे
७)शिवाजी समर्थ पेटे
८)डॉ.शोभा वैजनाथ बेंजरगे
९)संगीता अशोकराव पाटील- निलंगेकर…
