लातूर ग्रामीणमधील भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
लातूर / प्रतिनिधी
लातूर ग्रामीणमधील जवळा बु. (ता. लातूर) येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाचा विचार आणि नेतृत्वावर विश्वास ठेवत शनिवारी लातूर ग्रामीणचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार धिरज देशमुख यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून सर्वांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे व लोकनेते विलासराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व आमदार धिरज देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लातूर तालुक्यातील जवळा बु. येथील भाजपचे कार्यकर्ते विजय लोंढे, संतोष लोंढे, आकाश चव्हाण, गणेश लोंढे, सुरज चव्हाण, विकास लोंढे, ओमकार लोंढे, उमेश लोंढे, सचिन लोंढे, किशोर जोगदंड, लहू लोंढे, कुणाल ढगे यांनी आमदार धिरज देशमुख यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी काँग्रेसचे लातूर तालुकाध्यक्ष सुभाष घोडके, रेणापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रमोद जाधव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किसनराव लोमटे, गोविंद बोराडे, राम राजमाने, भैरवनाथ सव्वाशे, रघुनाथ शिंदे, बालाजी सुरवसे, मुकेश लोंढे, विनोद वीर आदी उपस्थित होते .
