जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी मराठा-मुस्लीम आणि दलितांना करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या रणनीतीचा भाग म्हणून आज अंतरवाली सराटी येथे मुस्लीम धर्मगुरु सज्जाद नोमानी, स्वत: मराठा आदोलक मनोज जरांगे पाटील आणि आनंदराज आंबेडकर आंबेडकर एकत्रित आलेले पाहायला मिळाले. तिघांमध्ये अंतरवालीमध्ये बैठक देखील पार पडली. या बैठकीनंतर सर्वांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
सज्जाद नोमानी काय काय म्हणाले?
मला भारताच्या संविधानाप्रमाणे दुसरे कोणतं संविधान नाही. संविधानातील प्रत्येक शब्दावर चर्चा होत होती. ती चर्चा त्यांच्या मुलाबाळांसाठी नाही. शेतकरी, मजूर आणि कष्टकऱ्यासांठी करत होते. भारतातील शोषित समाजाच्या चर्चा पार पडत होती. महाराष्ट्राने यामध्ये लिडिंग रोल घेतला होता. ही बाब महाराष्ट्रातील लोकांना समजली पाहिजे. महापुरुष maharashtraत जन्माला आले होते. मी उत्तरप्रदेशचा आहे. मात्र, मनोज जरांगे मला मराठी शिकवतील आणि मी जरांगेंना हिंदी शिकवेन, अशी आमच्यामध्ये ठरलं आहे. संपूर्ण देशात जरांगेंची गरज आहे. त्यामुळे हिंदी शिकणे गरजेचे आहे. मी प्रत्येक ठिकाणी त्यांच्या बोलण्याचा अनुवाद करेन. मनोज जरागेंच्या रुपाने भारताला आधुनिक गांधी-आंबेडकर आणि कलाम मिळणार आहे.

मनोज जरांगे काय काय म्हणाले?
मनोज जरांगे म्हणाले, एकत्रित येणे अगोदर गरजेचं होतं. आम्ही तडजोडीसाठी नाही अन्यायाच्या विरोधात एकत्रित आलो. आता शिफारशी घेऊन यायचं बंद करा. तीन तारखेला संध्याकाळपर्यंत सर्व डिक्लेअर होईल. आता आपलेच उमेदवार देणार आहोत. अशी लाट पुन्हा येणार नाही. आम्ही पक्ष म्हणून एकत्रित आलो नाही. सामाजिक आंदोलन म्हणून एकत्रित आलो आहोत. आम्हाला निवडून येऊन, समाजाच्या उद्धारासाठी आणि समाज सुखी करण्यासाठी काम करायचा आहे. मराठ्यांनी या संधीचा सोनं करावं.
ज्याच्या त्याच्या धर्माचा जसे त्याला स्वाभिमान असला पाहिजे. मी कट्टर हिंदू मला माझ्या धर्माचा स्वाभिमान आहे. आम्ही धर्म परिवर्तन नाही, सत्ता परिवर्तन करणार आहोत. चार तारखेपर्यंत अंतरवलीत कोणीही येऊ नका. शिफारशी करणे बंद करा. ज्या उमेदवाराचं नाव घेतलं त्याच्याच मागे मराठा उमेदवार उभे राहणार..राजकारण आपला धंदाच नाही, मात्र त्यांनी आम्हाला हलक्यात घेतलं. राखीव मतदारसंघ आमचे पूर्ण निघणार..ते खूप वळवळ करीत होत, आम्हाला खुन्नस दाखवण्यासाठी. आमच्या शिवाय नाही तर आमचेच सरकार स्थापन होणार.. लोकशाही प्रमाणेच तुम्ही तुमच्या मतदानापर्यंत जायचं दादागिरी करायची नाही. आम्हाला धमक्या द्यायच्या नाहीत. त्या भानगडीत तुम्ही पडायचं नाही, सर्वांनी आचारसंहितेचा सन्मान करून संयम धरायचा ते निवडणुकीनंतर बघू. जिथे आम्ही लढणार नाही तिथे आम्ही आमच्या विचाराचा माणूस निवडून येणार.., असंही मनोज जरांगे म्हणाले.
.