कासारखेडा ग्रामपंचायत सदस्यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
लातूर प्रतिनिधी
लातूर ग्रामीण मतदारसंघामधील लातूर तालुक्यातील कासारखेडा येथील ग्रामपंचायत सदस्य श्री अजिंक्य शिंदे व श्री चेतन शिंदे यांनी काँग्रेस पक्षाच्या ध्येयधोरणांवर व नेतृत्वावर विश्वास ठेवून आज बाभळगाव येथे लातूर ग्रामीणचे आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धिरज विलासराव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार धिरज देशमुख यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.लोकनेते विलासराव देशमुख, राज्याचे माजी मंत्री तथा सहकारमहर्षी दिलीपराव देशमुख, माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा आमदार धिरज देशमुख यांच्यावर व काँग्रेसच्या विचारावर विश्वास दाखवत कासारखेडा ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.यावेळी श्री संत शिरोमणी मारोती महाराज साखर कारखान्याचे चेअरमन शाम भोसले, महेंद्र भादेकर, अनुप शेळके, बालाजी बिराजदार, रघुनाथ शिंदे, अजित काळदाते, गणेश शिंदे, विष्णू फावडे, शुभम गडदे, धिरज गिरी आदी उपस्थित होते.
