डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल
लातूर : लातूर शहर विधानसभा मतदार संघाच्या भारतीय जनता पार्टी – महायुतीच्या अधिकृत उमेदवार डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी मंगळवारी महायुतीचे प्रमुख नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
याप्रसंगी माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे, आ. अभिमन्यू पवार, आ. बाबासाहेब पाटील, शहर जिल्हाध्यक्ष देवीदास काळे, शैलेश लाहोटी, शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख ॲड. बळवंत जाधव, बालाजी काकडे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मकरंद सावे, प्रशांत पाटील, सचिन दाणे, जितेंद्र बनसोडे, एन. डी. सोनकांबळे, भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड.दिग्विजय काथवटे, शिरीष कुलकर्णी, प्रवीण सावंत, मिनाताई भोसले , संगायोचे चेअरमन शिवसिंह सिसोदिया, अल्पसंख्यांक मोर्चाचे अध्यक्ष मोसीन शेख, लालासाहेब देशमुख, माजी नगरसेवक शैलेश स्वामी, शैलेश गोजमगुंडे, संगीत रंदाळे, शोभाताई पाटील, रागीणीताई यादव, आरोशी सोनवणे व सर्व मोर्चा अध्यक्ष, मंडल अध्यक्ष, महायुतीच्या घटक पक्षांचे प्रमुख कार्यकर्ते – पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजपच्या वतीने डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर यांना उमेदवारी देण्यात आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यात उत्साह संचारल्याचे दिसून येत आहे. डॉ अर्चनाताई पाटील चाकूरकर यांनी लातूर शहर मतदार संघातील मतदारांच्या भेटीगाठींवर अगोदरपासूनच भर दिला होता. मतदार संघातील जवळपास सर्वच परिसरातील मतदारांच्या भेटी घेऊन त्यांनी मतदारांशी सुसंवाद साधण्याचे काम केले आहे. डॉ. अर्चनाताईंच्या उमेदवारीमुळे भाजपसह महायुतीच्या कार्यकर्त्यातून विशेषतः महिला मतदारांतून समाधान व्यक्त केले जात असल्याचे दृष्टिपथास येत आहे.
