• Mon. Apr 28th, 2025

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत रेनापुरच्या भाजपा पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

Byjantaadmin

Oct 29, 2024

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या उपस्थितीत रेनापुरच्या भाजपा पदाधिकाऱ्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पनगेश्वर साखर कारखान्याचे संचालक सूरेश लहाने,सभापति दिलीप गोटके, सुग्रीव मुंढे, नगरसेवक गजेंद्र चव्हाण यांच्यासह वंजारी समाजाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

लातूर -आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेणापूर तालुक्यांतील भाजपचे नेते तथा पणगेश्वर साखर कारखान्याचे संचालक व लातूर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुरेश लहाने यांच्यासह रेनापुर पंचायत समितीचे माजी सभापती दिलीप घोडके वंजारी सेवा संघाचे महाराष्ट्राचे  संपर्कप्रमुख सुग्रीव मुंडे, रेणापूर नगर पंचायतीचे भाजपचे नगरसेवक गटनेते गजेंद्र चव्हाण, माजी सरपंच गोविन्द नागरगोजे, सुरेश केंद्रे, वंजारवाडीचे पोलीस पाटील सीताराम केदार,रमेश केंद्रे वैजनाथ लहाने जीवा पैलवान यांच्यासह अनेक भाजपा पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांच्या उपस्तित्तीत आशियाना निवासस्थानी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असून सर्व भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते यांचे दिलीपराव देशमुख यांनी स्वागत केले आहे या भाजपा नेत्यांच्या प्रवेशामुळे रेणापूर तालुक्यांतील भाजपला मोठे भगदाड पडले आहे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या प्रवेशाने कोंग्रेसचे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार धीरज विलासरावजी देशमुख  व काँग्रेस पक्षाची  ताकत वाढणार असल्याचे चित्र यावेळी दिसत होते

यावेळी  राज्य साखर महासंघाचे सदस्य आबासाहेब पाटील जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, जिल्हा कोंग्रेसचे अध्यक्ष श्रीशैल्य उटगे, पंचायत समितीचे माजी उपसभापती अप्पासाहेब मुंडे, रेणा साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष तथा संचालक यशवंतराव पाटील रेणा साखर कारखान्याचे अध्यक्ष सर्जेराव मोरे,जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष कोंग्रेसचे तालुकाध्यक्ष अँड प्रमोद जाधव, रेणापूर बाजार समितीचे माजी सभापती चंद्रचुड चव्हान ,जनार्दन वंगवाड, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले, अँड बाबासाहेब गायकवाड, अभिजित चव्हाण, रेणा चे संचालक डॉ हरिदास यांच्यासह मान्यवर उपस्थित होते..

भविष्याचा विकासाचा वेध घेवून आम्ही काँग्रेसकडे आलोय जुनी भाजप राहिली नाही-सुरेश लहाने यांची प्रतिक्रिया

लातूर जिल्ह्याची विकासाकडे वाटचाल सुरू आहे मागील काळात लोकनेते विलासराव देशमुख साहेब  माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब माजी मंत्री मंत्री अमीत देशमुख आपले आमदार धीरज देशमुख यांनी या भागात अतिशय चांगल काम केले आहे भविष्यात चांगले काम करतील रेणापूर तालुक्यांतील विकासाची कामे काँग्रेस पक्ष करू शकतो देशमुख परिवार यांच्या नेतृत्वाखाली या भागाचा भविष्यात विकास होऊ शकतो यासाठी आम्ही सर्वांनी भाजपा सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला असे सांगून आम्ही भाजपमध्ये भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत कार्य केले जूने लोक आता भाजप मध्ये राहिलेले नाहीत त्यामुळे हळूहळू लोक बाहेर पडतील अशी माहिती भाजपचे जेष्ठ नेते पनगेश्वर शुगर कारखान्याचे  संचालक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश लहाने यांनी यावेळी बोलताना दिली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed