आर्वी ग्रामपंचायत हददीमध्ये 30 कोटीचा निधी खेचून आणला लातूर शहर विधानसभेचा जाहीरनामा हा लोकाभिमुख असेल
महायुती सरकारने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडवला माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख
लातूर शहरानजीकच्या आर्वी येथे पदयात्रा संपन्न
लातूर (प्रतिनीधी) : गेल्या पाच वर्षात आर्वी गावात ३० कोटी पेक्षा अधिक विकास केली आहेत. या
निवडणुकीतील काँग्रेसचा लातूर शहर विधानसभेचा जाहीरनामा हा लोकाभिमुख
असेल, काँग्रेसने देशात पहिल्यांदा लातूरमध्ये महिलांना सिटी बस प्रवास
मोफत केला असे राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व
लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले.
गुरुवार दि. २४ ऑक्टोंबर रोजी सायंकाळी लातूर शहर मतदारसंघातील लातूर
शहरानजीकच्या आर्वी येथे पदयात्रा केली, स्थानिक महिलांनी औक्षण करून
फुलांची पुष्पवृष्टी करून माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांचे स्वागत
केले यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी
लातूर शहर मतदार संघातील केलेल्या विकास कामांच माहितीपत्रक या पदयात्रेत
भाजीपाला विक्रेते किराणा दुकानदार महिला ज्येष्ठ नागरिक यांना दिले.
यावेळी लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, ट्वेंटीवन
शुगरचे व्हॉइस चेअरमन विजय देशमुख, आर्वीचे निरीक्षक अनिल पाटील, आर्वीचे
सरपंच पप्पू देशमुख, बापू चव्हाण, विलास भोसले, धनंजय गाडगीळ, ज्ञानेश्वर
चौधरी, सचिन बंडापले, चांदपाशा इनामदार, बाबा पठाण, सुलेखा कारेपूरकर,
अशोक चव्हाण, राम स्वामी, विजय टाकेकर, राज क्षीरसागर, गणेश नवशिंदे,
प्रल्हाद रणखांब, दयानंद जाधव, आदीसह काँग्रेस महाविकास आघाडीचे विविध
पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरीक उपस्थित होते
आर्वी येथील भक्तिनगर येथून पदयात्रेला सुरुवात झाली त्यानंतर माजी
मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी भक्ती हनुमान मंदिर व श्री साई
गणेश हनुमान मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले त्यानंतर पदयात्रा साई रोड
तिरुपती नगर पठाण नगर तर समारोप अहिल्यादेवी होळकर नगर येथे झाला.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, लोकनेते विलासराव
देशमुख यांच्या नेतृत्वाखाली भक्ती नगर वसाहत विकसित झाली. लातूरचा
विस्तार चारही दिशांनी झाला लातूरची उत्तरोत्तर प्रगती होत आहे, त्याचे
लक्षण ही उत्तरेकडील वसाहत आहे. लातूर शहर मतदार संघात आम्ही कोट्यावधीचा
निधी खेचून आणला. आर्वी ग्रामपंचायत हादिमध्ये 30 कोटीचा निधीही आम्ही
दिल्ली मुंबई वरून खेचून आणला आर्वी ग्रामपंचायत मध्ये नागरीकरण
झपाट्याने झाले आहे. आर्वीच्या विकासाची भूख अधिक आहे यासाठी आणखी आम्ही
काम करू असे त्यांनी सांगितले.
महायुती सरकारने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडवला
पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रात महायुती सरकारने कायदा व
सुव्यवस्थेचा बोजवारा उडवला आहे, महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार या राज्यात
मोठ्या प्रमाणात वाढला आहे. काँग्रेसचा लातूर शहर विधानसभेचा जाहीरनामा
हा लोकाभिमुख असेल काँग्रेसने देशात पहिल्यांदा लातूरमध्ये महिलांना सिटी
बस प्रवास मोफत केला असे ते म्हणाले.
खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांची पांखरसांगवी येथे पदयात्रा संपन्न्
लातूर लोकसभेचे खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी लातुर शहर
विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अमित विलासराव
देशमुख यांच्या प्रचारार्थ जनसंपर्क अभियान सुरु केले असून गुरुवार दि.
२४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पांखरसांगवी येथे पदयात्रा काढून नागरीकांशी
संवाद साधला, या ठिकाणी नागरीकांचा ऊस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पदयात्रे
दरम्यान ठिकठिकाणी ग्रामस्थानी औक्षण करुन स्वागत केले.
जनसंपर्क अभियान पदयात्रा – वैशालीताई़़ देशमुख क़ासारगाव येथील ग्रामस्थांशी साधला संवाद
जनसंपर्क अभियान अंतर्गत अमित विलासराव देशमुख यांच्या प्रचारार्थ
कासारगाव येथे पदयात्रेच्या माध्यमातून चेअरमन वैशाली विलासराव देशमुख
यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. या पदयात्रेत आणि संवाद बैठकीस गोपाळ
बडे, जयदेव मोहिते, नंदकिशोर मोहिते, जजकुमार मोहिते, महादेव बुटके,
जीवनाराव मोहिते, विनोद दिवे, सुनिल मोहिते, सूर्यकांत मोहिते, लक्ष्मण
सपाटे, वामन मोहिते, बाबासाहेब मोहिते, विठ्ठल भगाडे, संभाजी कांबळे,
संचिता रत्त्नगोले, रंजना मोहिते, महानंदा मोहिते, छायाबाई मोहिते,
मुद्रिकाबाई सपाटे, राधाबाई केळे, मंगल जाधव, शेषाबाई भोसले, सुमनबाई
मोहिते, रोहिणी तोडकर, कौशाबाई मस्के, अनुसया कांबळे, बालिका बडे, पुष्पा
मोहिते, शकुंतला भगाडे, कलावती कदम आदी उपस्थित होत्या़

संचालीका अदिती अमित देशमुख यांनी वासनगाव ग्रामस्थांची घेतली भेट
टवेन्टिवन शुगर्स ली. च्या संचालीका अदिती अमित देशमुख यांनी लातुर शहर
विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार अमित विलासराव
देशमुख यांच्या प्रचारार्थ जनसंपर्क अभियान अंतर्गत गुरुवार दि. २४
ऑक्टोबर रोजी सायंकाळी वासनगाव येथे पदयात्रा काढून नागरीकांशी संवाद
साधला, या पदयात्रेस नागरीकांचा ऊस्फुर्त प्रतिसाद मिळाला. पदयात्रे
दरम्यान ठिकठिकाणी ग्रामस्थानी औक्षण करुन स्वागत केले.