• Tue. Apr 29th, 2025

एकजुटीने काम करा, आपली ताकद दाखवा -आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे आवाहन

Byjantaadmin

Oct 25, 2024

एकजुटीने काम करा, आपली ताकद दाखवा -आमदार धिरज विलासराव देशमुख यांचे आवाहन


लातूर/ प्रतिनिधी- लातूर ग्रामीण मतदारसंघांमध्ये लातूर जिल्हा मध्यवर्ती बँक, साखर कारखाना तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून आपण सर्वसामान्य शेतकऱ्यांची कामे केलेली आहेत. आता आपण सर्वांनी मिळून एकजुटीने विधानसभेसाठी काम करायचे आहे. लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने तुम्ही काँग्रेसला सहकार्य केले. त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीत सहकार्य करा, असे आवाहन करत ही निवडणूक महाराष्ट्राच्या भवितव्याची निवडणूक असल्याचे प्रतिपादन लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केले.

आमदार धिरज विलासराव देशमुख हे भिसे वाघोली, वाडी वाघोली, मसला, निळकंठ, भोसा, पिंपळगाव अंबा आंबा, कानडी बोरगाव, तांदूळजा,गाधवड आदी गावांच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी मतदारांशी घरगुती बैठकीमध्ये संवाद साधला. या गावभेटी दरम्यान त्यांचे जागोजागी मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.आगामी विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचे सरकार निश्चित येणार आहे, असा विश्वास व्यक्त करत ते म्हणाले की, ही स्पर्धा आपण मागच्या विधानसभेत मला दिलेल्या मताधिक्याशी आहे. या निवडणुकीमध्ये मताधिक्याचा एक विक्रम आपण या ठिकाणी करावे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो ही पदयात्रा काढून संविधान वाचवण्यासाठी प्रयत्न केले. देश, राज्य व सरकार हे संविधानाच्या माध्यमातून आणि कायद्याच्या चौकटीमध्ये चालले पाहिजे, असेही ते म्हणाले.

यावेळी लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथराव शिंदे, मांजरा साखर कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, लातूर तालुका काँग्रेस पक्षाचे सुभाष घोडके, मांजरा साखर कारखान्याचे संचालक मदन भिसे, बंकट पाटील, दयानंद बिडवे, अॅड. भागवत पिसाळ, महेश अन्नदाते, अमोल भिसे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.येणाऱ्या काळामध्ये समाजाचे सर्व प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही बांधील आहोत. दि. २० नोव्हेंबरला सकारात्मक विचार करा व पुन्हा काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान करा, असे आवाहन केले.मतभेद विसरुन कामाला लागागावातील आपापसातील मतभेद या निवडणुकीत विसरा. ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्याची निवडणूक आहे, असे सांगून गावामध्ये समन्वय, संवाद, एकजूट असेल तर सर्व प्रश्न सुटतात. आपण सर्वांच्या सहकार्याने भविष्यात काम करू असा विश्वास व्यक्त करत विकास कामाला दिशा देण्याचे काम ग्रामस्थांनी करावे त्यासाठी समन्वय असला पाहिजे, असेही ते म्हणाले .

यावेळी कल्याण मांदळे, रणजीत पाटील, सुनील भिसे, प्रताप खोसे, नवनाथ शिंदे, विनायक शिंदे, मोहसीन पठाण, रणजित पाटील, सत्तार पटेल, अण्णासाहेब भिसे, बाळासाहेब पाटील, समाधान भिसे, जाफर सय्यद, दिलीप पाटील, उत्तम सुभेदार, हनुमंत सुभेदार, महादेव बिडवे, बालाजी आल्टे, धनंजय बावणे, कल्याण बावणे, शिवाजी धुमाळ, ज्ञानेश्वर आल्टे, बसलिंग वांगसकर, बंडू स्वामी, अशोक काळे, दत्ता औताडे, महेश चव्हाण, केरबा शिंदे, आकाश नरसिंगे आदींसह काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या गावभेटी दरम्यान उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed