• Tue. Apr 29th, 2025

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे, चेअरमन वैशालीताई देशमुख,अदिती अमित देशमुख यांच्या पदयात्रांना ऊस्फुर्त प्रतिसाद

Byjantaadmin

Oct 24, 2024

माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख, खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे, चेअरमन वैशालीताई देशमुख, संचालीका अदिती अमित देशमुख यांच्या पदयात्रांना ऊस्फुर्त प्रतिसाद लातुर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे जनसंपर्क अभियान

लातूर (प्रतिनीधी) : लातुर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेस महाविकास आघाडीचे जनसंपर्क अभियान सुरु केले असून बुधवार दि. २३ मार्च रोजी सायंकाळी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महाराणा प्रताप नगर (म्हाडा कॉलनी), विलास कारखान्याच्या चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी खाडगाव, खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी रायवाडी तर टवेन्टिवन ॲग्रीच्या संचालीका अदिती अमित देशमुख यांनी सिंकदरपूर येथे प्रचारार्थ पदयात्रा काढून नागरीकांशी संवाद साधला, या चारही ठिकाणी नागरीकांचा ऊस्फुर्त प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी पदयात्रेचे औक्षण करुन स्वागत करण्यात आले. यावेळी महारणा प्रमाप नगर येथे लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष किरण जाधव, माजी महापौर विक्रांत गोजमगुंडे, लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जगदीश बावणे, व्हा.चेअरमन विजय देशमुख, महाराणा प्रताप नगरच्या सरपंच संगीता पतंगे, उपसरपंच राजकुमार पवार, महाराणा प्रताप नगरचे निरीक्षक तथा बाभळगाव उपसरपंच गोविंद देशमुख, विद्याताई पाटील, शिवाजी देशमुख, राम स्वामी, हमीद बागवान, यशपाल कांबळे, सुंदर
पाटील कव्हेकर, सचिन बंडापल्ले, अकबर माडजे, अभिषेक पतंगे, सहदेव मस्के, युनूस मोमीन, विजयकुमार पतंगे, नामदेव उपाडे, सज्जाद पठाण, आडे, लता कांबळे, सुलोचना उपाडे, मुजोद्दीन इनामदार, युसुफ शेख आदीसह काँग्रेस महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते स्थानिक नागरीक उपस्थित होते. म्हाडा कॉलनी येथून पदयात्रेला सुरुवात झाली, त्यानंतर माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी हनुमान मंदिर येथे जाऊन दर्शन घेतले त्यानंतर कुशिनारा बुद्ध विहार इथे जाऊन बुद्ध वंदना केली तसेच त्यांनी मतदान जनजागृती पथनाट्य सादर करण्यात आलेल्या कलाकारांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की, गेल्या अडीच वर्षातील महायुती सरकारच्या कारभारामुळे महाराष्ट्राची लूट मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचार फोफावला आहे, जनता असुरक्षित आहे, महिलावर दलित अल्पसंख्यांक भटके विमुक्त यांच्यावर मोठ्या प्रमाणावर अत्याचार होत आहेत. सामान्य माणसाची सध्या पिळवणूक होत आहे, महाराणा प्रताप नगर, बाभळगाव, म्हाडा कॉलनी येथे पूर्वी काही नव्हते. सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी लोकनेते विलासराव देशमुख यांनी या वसाहतीची निर्मिती केली या कॉलनीमध्ये बंगले इमारती उभ्या राहिल्या ही सुबत्ता काँग्रेसमुळे आली असे त्यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की लातूरात आज सर्वजण गुण्यागोविंदाने उद्योग व्यवसाय व्यापार करतात 2019 ते 2024 या पाच वर्षात लातूर शहर विधानसभा मतदारसंघासाठी आम्ही 2250 कोटी रुपये चा निधी खेचून आणला महाराणा प्रताप नगर येथे 70 कोटी रुपये मंजूर केले पाणीपुरवठा योजना ही येथील 54 कोटीची मंजूर केली सध्याच महायुती सरकार 40 टक्के कमिशन वाली सरकार आहे काँग्रेसच इमान कधीही डगमगलेला नाही काँग्रेस पक्षने सर्व धर्म समभाव कायम जोपासला आम्ही एक हेल्पलाइन सुरू करत आहोत की जीवर फोन करायचा तुम्ही तुम्ही जिथे तिथे अडचणीत असाल तिथे येऊन तुम्हाला आमदार अमित देशमुख यांचा प्रतिनिधी मदत करेल बेकारी महागाई भ्रष्टाचार खुटलेले औद्योगीकरण यासारख्या गंभीर समस्या महायुती सरकारने निर्माण केले आहेत लातूर जिल्हा रुग्णालय आम्ही मंजूर केले त्याची वीट सुद्धा या सरकारला रचता आली नाही आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत या परिसरात
राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखा लवकर स्थापन कराव्यात लातूर आतील अवेध धंदे गुन्हेगारी कमी झाली पाहिजे लातूर आतील जनतेला सुरक्षित वाटले पाहिजे असे त्यांनी सांगितले. ते म्हणाले की महायुतीचे नेते प्रचाराला आले की तुम्ही त्यांना जाब विचारा मागच्या अडीच वर्षात तुम्ही काय काम केले ते रेल्वेच्या कारखान्यात लातूरकरांना एकही नोकरी मिळाली नाही भाजप नेते उजनीतून पाणी आणू म्हणाले नाही पाणी आणले तर राजकारणातून संन्यास घेऊ म्हणाले त्यांनी आता राजकारणातून संन्यास घ्यावाच मी स्वतः अमित देशमुख आहे असे समजून काँग्रेस महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी प्रचार करावा
येत्या 20 नोव्हेंबरला सर्वांनी हाताच्या पंजा समोरील बटन दाबून काँग्रेस महाविकास आघाडीला मोठ्या मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन केले.

खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी रायवाडी येथे सांधला मतदारांशी संवाद लातूर लोकसभेचे खासदार डॉ. शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी रायवाडी येथे जाऊन गावातील सर्व मतदारांची घरोघेरी जाऊन थेट भेट घेतली. यावेळी
मतदारांशी त्यांनी संवाद साधला. चेअरमन वैशाली विलासराव देशमुख यांनी खांडगाव येथील नागरीकांशी सांधला संवाद श्रीमती वैशालीताई देशमुख यांनी महिला मतदारांची घेतली थेट भेट

सध्या विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे़ त्यानिमित्ताने विलास सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन श्रीमती वैशालीताई विलासराव देशमुख यांनी दि़ २३ आॅक्टोबर रोजी लातूर तालुक्यातील खाडगाव येथे थेट महिला
मतदारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला़ काँग्रेस महाविकास आघाडीला पुन्हा एकदा आशिर्वाद द्यावा, असे आवाहन त्यांनी केले़. खाडगाव येथे बुधवारी संवाद मेळाव्याचे आयोजन केरण्यात आले होते. प्रारंभी वैशालीताई देशमुख यांनी गावातून पदयात्रा काढून महिला मतदारांची थेट भेट घेतली़ या पदयात्रेस महिला मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
मिळाला़ त्यानंतर आयोजित संवाद मेळाव्यात त्यांनी संवाद साधला़ यावेळी काँग्रेसच्या नेत्या सुनिताताई अरळीकर, लातूर पंचायत समितीच्या माजी सभापती शितलताई फुटाणे, खाडगावचे सरपंच नेताजी देशमुख, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक युवराज जाधव, अनंत बारबोले, अभिनंद जाधव, सविता देशमुख, कांताबाई मस्के यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना वैशालीताई देशमुख म्हणाल्या, थापा मारुन जनतेची दिशाभूल करणे हेच भाजपा महायुतीचे भांडवल आहे़ जनतेच्या विकासाच्या योजनांचा दृष्टीकोन त्यांच्याकडे नाही़ या उलट काँग्रेस महाविकास आघाडी जनसामान्याच्या सर्वांगीण विकासाचे ‘व्हीजन’ घेऊन आपल्यासमोर येत आहे़ विधानसभेच्या निवडणुकीत लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री आमदार अमित देशमुख व लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून आमदार धिरज देशमुख यांना प्रचंड मतांनी विजयी करावे, असे आवाहन केले़ याप्रसंगी भास्करराव जाधव, दौलतराव देशमुख, स्वाती देशमुख, सविता देशमुख, आशाताई मलवाड, कांताबाई मगर आदीसह कॉग्रेस पक्षाचे पधादिकारी व गावकरी उपस्थित होते.

टवेन्टिवन ॲग्रीच्या संचालीका अदिती अमित देशमुख यांनी सिंकदरपूर येथे जाऊन मतदारांची घेतली भेट टवेन्टिवन ॲग्रीच्या संचालीका अदित अमित देशमुख यांनी सिंकदरपूर येथे जाऊन मतदारांची भेट घेतली. गावातील विशेषता महीला, नवमतदारांनी त्यांची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed