• Tue. Apr 29th, 2025

मविआचा 85-85-85 चा फॉर्म्युला, मित्रपक्षांना झुकतं माप, संजय राऊत अन् नाना पटोलेंची मोठी घोषणा

Byjantaadmin

Oct 23, 2024

महाविकास आघाडीची पत्रकार परिषद खासदार संजय राऊत, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, विजय वडेट्टीवार, अनिल देशमुख, अनिल देसाई यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी संजय राऊत यांनी महाविकास आघाडीच्या जागावाटपासंदर्भात प्रश्न विचारले जायचे असं म्हटलं. मविआची बैठक शरद पवार यांच्या सोबत पार पडली. शरद पवार यांनी महाविकास आघाडीचं जागावाटप जाहीर करण्याचे आदेश दिले. मविआचं जागावाटप सुरळीतपणे पार पडलं आहे, असं राऊत यांनी सांगितलं.  समाजवादी पार्टी, शेकाप यांंना सामावून घेणारं जागावाटप असेल. 85-85-85 असं एकूण 270 जागांवर यादी बनवलेली आहे. उरलेल्या जागांवर मित्रपक्षांसोबत चर्चा सुरु होईल. या प्रकारे 288 जागा मविआ पूर्ण ताकदीनं लढेल,असं संजय राऊत म्हणाले.  

288 जागांचा प्रश्न सुटला असं सांगतो तेव्हा ते अत्यंत जबाबदारीनं सांगतो. आमच्या मित्रपक्षांसोबत चर्चा सुरु आहेत. आमच्या यादीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या जागा असल्या तरी चर्चा सुरु आहेत. महाविकास आघाडीत आम्ही एकत्र आहोत आणि चर्चा सुरु आहेत, असं संजय पाटील म्हणाले. नाना पटोले यांनी तीन राजकीय पक्षांची बैठक शरद पवार यांच्यासमोर झाली. 85-85-85 या जागांवर मिळून एकूण 270 जागांवर एकमत झालं आहे. उर्वरित 18 जागांवर शेकाप, कम्युनिस्ट, समाजवादी पक्षांसोबत चर्चा सुरु आहेत. उद्या या जागांवर आमच्यामध्ये स्पष्टता येईल. महाविकास आघाडी म्हणून ही निवडणूक लढत आहोत. MAHARASHTRA त मविआचं सरकार येईल, असं नाना पटोले म्हणाले. 

शरद पवार यांच्यासोबतच्या बैठकीनंतर मविआच्या सर्व पक्षाच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेत जागावाटपासंदर्भातील घोषणा केली आहे. मविआ 18 जागा कुणाला देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून  पहिल्या यादीत 65  उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. मात्र तिन्ही पक्षांकडून काही नावांची घोषणा करण्यात आली असली तरी त्यामध्ये बदल होतील, असं संजय राऊत म्हणाले. 

दरम्यान, मविआच्या तीन पक्षांकडून पहिल्या टप्प्यात 85-85-85 जागा घेण्यात आल्या असल्या तरी ज्या जागांवरुन वाद होत्या त्या मागं ठेवण्यात आल्या आहेत. मविआकडून मित्रपक्षांना 18 जागा सोडल्या जातील असं सांगण्यात आलं. मुंबईत  ठाकरेंच्या शिवसेनेकडून वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर, ज्या जागांवरुन वाद होता त्या भायखळा आणि वर्सोवा या जागांवरील उमेदवारांच्या नावांची घोषणा सेनेकडून करण्यात आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed