आ.निलंगेकर यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद !
निलंगा/प्रतिनिधी:आ.
संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी शनिवारी (दि.१९ ) निलंगा विशानसभा मतदारसंघातील झरी बु.येथे ग्रामस्थांसोबतच विद्यार्थ्यांशी गप्पा मारत त्यांच्या भावना समजून घेतल्या.विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आ.निलंगेकर यांचा मतदारसंघात दौरा सुरू आहे.यादरम्यान त्यांनी झरी बु.येथे भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.यावेळी शाळा सुटल्यानंतर घरी परतणाऱ्या विद्यार्थ्यांशी आ.निलंगेकर यांनी संवाद साधला.
निवडणुकीच्या व्यस्त कार्यक्रमातही ते बराच काळ विद्यार्थ्यांमध्ये रमले. विद्यार्थ्यांशी मनसोक्त गप्पा मारल्या.आजचे विद्यार्थी उद्याच्या विकसित भारताचे नागरिक आहेत.त्यांची मोठी-मोठी स्वप्न आहेत. ती जाणून घेण्यासाठी आलो असल्याचे ते म्हणाले.विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या आत्मविश्वासाचे त्यांनी कौतुकही केले.शिक्षणासाठी शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांकडूनही अनेक बाबी शिकायला मिळतात असे त्यांनी सांगितले.विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना अभ्यास,शाळेत राबविले जाणारे उपक्रम यासंदर्भातही माहिती घेतली.अक्का फाउंडेशनच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत त्यांनी विद्यार्थ्यांकडे विचारणा केली. शिक्षणादरम्यान किंवा कुठल्याही बाबतीत अडचण आली तर थेट संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.यावेळी बीदर जिल्ह्यातील भाजपा पदाधिकारी सुधीर काडादी,माजी नगरसेवक किशोर लंगोटे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.
