• Tue. Apr 29th, 2025

भ्रष्टाचार करणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांनी सन्मानाने जवळ केले-माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार

Byjantaadmin

Oct 18, 2024

भ्रष्टाचार करणाऱ्यांना सत्ताधाऱ्यांनी सन्मानाने जवळ केले-माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सत्ताधाऱ्यांवर प्रहार 

लातूर ग्रामीण च्या भादा सर्कलमधे भाजपला भगदाड अनेकांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश

लातूर दि. १८.आगामी होणारी विधानसभा निवडणूक ही आपल्या प्रपंचाची आहे राज्यात  भाजपचे सरकार आहे असे वाटत नाही सरकारमध्ये केवळ ९ मंत्री भाजपचे आहेत तर  राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात शिंदे व अजित पवार यांचेच जास्त मंत्री असून भाजप बाहेरून पाठिंबा दिल्यासारखे दिसत आहेत गेल्या आडीच वर्षात सत्तेवर आलेल्या महायुती सरकारने सर्व घटकांचा भ्रमनिरास केला फसवे आश्वासन भूलथापा देऊन लोकांची दिशाभूल करत आहेत जे लोक भ्रष्टाचारी लोकांवर कारवाई करू असे सांगणारे भाजप आता राहिली नसून भ्रष्टाचारी लोकाना सत्तेत सामील करून घेत त्यांचा सन्मान करत त्यांना जवळ केले असून लोकांची विश्वासार्हता सत्ताधाऱ्यांनी गमवली आहे सरकार दिवाळखोर झाल्याची  टीका राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी करत या महायुती सरकारला आगामी विधानसभा निवडणुकीत पराभुत करा असे आवाहन राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख साहेब यांनी येथे बोलताना व्यक्त केले ते शुक्रवारी लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील भादा सर्कल मधील प्रमुख काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते बूथ प्रमुख यांची संवाद बैठक लातूर येथे घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते 

यावेळी व्यासपीठावर लातूर ग्रामीणचे आमदार धीरज विलासरावजी देशमुख, माजी आमदार वैजनाथ शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य नारायणराव लोखंडे, माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख,जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे लातूर जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष संतोष देशमुख, मांजरा साखर कारखान्याचे संचालक महेंद्र भादेकर, संचालक शेरखा पठाण, मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष शामराव भोसले उपाध्यक्ष सचिन पाटील, मारुती महाराज साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष गणपतराव बाजुळगे विलास साखर कारखान्याचे उपाध्यक्ष रवींद्र काळे, जिल्हा बँकेच्या संचालिका स्वयंप्रभा पाटील, जिल्हा बँकेचे संचालक अनुप शेळके , पृथ्वीराज शिरसाट, राजकुमार पाटील, जनार्दन वंगवाड, अँड प्रवीण पाटील सचिन दाताळ संभाजी सुळ चांदपाशा इनामदार रामदास पवार कोंग्रेसचे मीडिया प्रमुखं हरिराम कुलकर्णी, रघुनाथ शिंदे बालाजी पांढरे शिवाजी कांबळे उपस्थित होते

भादा सर्कलच्या विकासाची माझी गॅरंटी-माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी दिला शब्द

यावेळी बोलताना माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब म्हणाले की औसा तालुक्यातील २७  गावात आमदार धीरज देशमुख यांनी मागच्या पाच वर्षात विकासाची कामे केलेली आहे बहुतांश कामे प्रगतीपथावर आहेत रस्ते, पुल, शाळा, समाज सभागृह आदींचे काम झालेली असून या भागात माझे स्नेह संबंध गेली ४० वर्षापासून आहेत मांजरा साखर कारखाना जिल्हा बँकेच्या माध्यमातून लोकांना कुठलाही भेदभाव न करता मदत करण्याचे काम परिवाराने केले आहे पुढेही करणार आहोत असे सांगून ही विधानसभेची निवडणूक आहे ग्रामपंचायत सोसायटी निवडणूक थोडे फार गावात मतभेद असतात ते विसरून जावे एकमेकांशी संवाद ठेवावा आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार धीरज देशमुख यांना या भादा सर्कल मधून जास्तीत जास्त मताधिक्य द्यावे यासाठी आताच कामाला लागावे या भागातील विकास कामासाठी माझी गॅरंटी राहील असे सांगून एक मॉडेल मतदार संघ आपण करनार असल्याचे यावेळी दिलीपराव देशमुख यांनी सांगितले.

विजयाची घौडदौड सुरू ठेवा विकासाचे प्रश्न मार्गी लावले

यावेळी बोलताना लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख म्हणाले की मागच्या पाच वर्षाच्या काळात येलोरी शिंदाळा वानवडा भादा बोरगाव भेटा या सर्व गावांमध्ये अनेक विकासाची काम केले  असून प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केल्याने आज भादा सर्कल मध्ये अनेक गावात विकासाची कामे प्रगतीपथावर असल्याचे सांगून येणाऱ्या काळात राहिलेल्या विकास कामासाठी गती मिळेल यासाठी काँग्रेस पक्षाला आशिर्वाद द्यावेत सत्ताधारी पक्षाचे लोक  ज्या पद्धतीने आश्वासनांचा पाऊस पाडत आहे आम्ही मात्र जे काम केली तेच सांगत आहोत सत्ताधारी पक्षावर टीका करत लोकांचें कुठलेच प्रश्न सरकारने सोडवले नाहीत शेतकऱ्यांना पीक विमा नाही अनुदान रखडले नुकसान भरपाई मिळाली नाही सरकारबद्दल लोकांत नाराजी व्यक्त होत आहे ती नाराजी आपल्या मतपेटितून व्यक्त करावी काँग्रेसला जास्तीत जास्त मताधिक्य या भादा सर्कल मधून विधानसभेला द्यावे विजयाची घौडदौड सुरू ठेवावी अशी अपेक्षा आमदार धीरज देशमुख यांनी व्यक्त केली 

जिल्ह्यातील जडणघडण टिकवण्यासाठी काँग्रेसला साथ द्या

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या रणसंग्राम सुरू झाला आहे ५ वर्षानंतर ही निवडणूक होत असते कारभारी कोण हवा आहे यासाठी ही निवडणुक जनतेच्या अदालती मध्ये होणार आहे जिल्ह्यात लोकनेते विलासराव देशमुख साहेब माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब यांनी ज्या पद्धतीनं सहकार चळवळ टिकवली वाढवली विविध विकासाचे प्रश्न मार्गी लावले आज सगळीकडे विकास झालेला दिसत आहेत त्याचे श्रेय आपल्या काँग्रेस नेत्याकडे जाते हे टिकवण्यासाठी काँग्रेसला साथ द्यावी हाताचा पंजाचे बटन दाबा अधिक मताधिक्य द्यावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले .यावेळी माजी आमदार वैजनाथ शिंदे,माजी जिल्हा परिषद सदस्य नारायणराव लोखंडे माजी जिल्हा परिषद सदस्य धनंजय देशमुख,हभप  धनराज महाराज रोंगे, सूर्यकांत पाटील सचिन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले

भादा सर्कल मधील भाद्याचे सरपंच दरेकर यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश

राज्यात निवडणुका लागलेल्या असताना सत्ताधारी पक्षावर लोकांची नाराजी व्यक्त असताना आज शुक्रवारी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भादा येथील भाजपचे सरपंच हणमंत दरेकर, भाजपचे सचिन मुखंडे, सोमनाथ कांबळे, राजेन्द्र ढवळे, मिठू शेख शरीफ, दिंगबर शिंदे, बालाजी पाटिल, तानाजी शिंदे, अमोल जमादार, मारुती गाडेकर, शाहूराज गवळी, मन्मथ मजगे, गोपाळ माळी, यांच्यासह आदींनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तसेच 

. सत्तधरवाडी येथील व्हॉईस चेअरमन नवनाथ बोकडे, कवठा केज येथील उपसरपंच अरुण होदाडे यांच्यासह अनेकांनी भाजपला रामराम ठोकून काँग्रेस पक्षात प्रवेश केला प्रवेश केलेल्या सर्वांचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब आमदार धीरज देशमुख यांनी स्वागत करून त्यांचा सत्कार केला. यावेळी संवाद बैठकिस उजणी भादा, सर्कल मधील टाका, सिंदाला, भेटा, बोरगाव, लखणगाव  शिवली गावातील काँग्रेस पदाधिकारी बूथ प्रमुख यूवक कोंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 

रामकृष्ण हरी धीरज देशमुखच लई भारी

यावेळी बोलताना हभप धनराज रोंगे महाराज यांनी महायुती सरकारने सर्व समाजाला फसवले आहे कुठल्याच योजना सुरू नाहीत फक्त घोषणांचा पाऊस पाडत आहे सरकार असे सांगून शेतकऱ्यांना पिक विमा नाही अनुदान नाहीं पिकाला हमी भाव नाही समाजातील प्रत्येक घटकाला नुसत्या घोषणा देवुन लोकांची दिशाभूल करणारे महायुतीचे सरकार असून त्यासाठी आपले सरकार आमदार धीरज देशमुख यांनी चांगल काम करीत आहेत यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभे रहा असे सांगून रामकृष्ण हरी आपले लाडके आमदार धीरज देशमुख लई भारी म्हणत त्यांना आशीर्वाद द्या असे आवाहन केले त्यावर   उपस्थित पदाधिकारी कार्यकर्ते यांनी टाळ्यांचा गजर करीत धीरज देशमुख यांच्या विजय असो अशा घोषणा देत सभागृह दणाणून सोडले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed