• Wed. Apr 30th, 2025

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती शिष्टमंडळाने माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांची घेतली भेट

Byjantaadmin

Dec 16, 2022

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी अधिकारी अभियंता
संघर्ष समिती शिष्टमंडळाने माजी मंत्री, आमदार अमित विलासराव देशमुख यांची घेतली भेट

महावितरण कंपनीच्या क्षेत्रात समांतर परवाना
न देण्याबाबत दिले निवेदन

लातूर (प्रतिनिधी) १६ डीसेंबर २२ :  महाराष्ट्रातील काही शहरांच्या वीज पुरवठ्याची जबाबदारी खाजगी
कंपन्यांकडे सोपवण्याच्या हालचाली शासनाकडून होत आहेत, हे प्रयत्न थांबवण्यात यावेत अशी मागणी करणारे निवेदन महावितरण अधिकारी, कर्मचारी संघटनेच्या वतीने बाभळगाव निवासस्थानी राज्याचे माजी वैद्यकीय शिक्षण सांस्कृतिक कार्यमंत्री व लातूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा आमदार
अमित विलासराव देशमुख यांना शुक्रवार दि. १६ डिसेंबर २०२२ रोजी  देण्यात आले. यावेळी माजी मंत्री, आमदार देशमुख यांनी महाराष्ट्रातील जनतेचे हीत लक्षात घेता खाजगीकरणाचे सदरील प्रयत्न थांबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा केला जाईल असे आश्वासन या शिष्टमंडळाला दिले.

महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी अभियंता संघर्ष समिती शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन राज्यातील ठाणे व नवी मुंबई परिसरातील महावितरण कंपनीच्या अधिपत्याखालील क्षेत्रात अदानी इलेक्ट्रिकल कंपनीला चालवायला देण्यासाठी समांतर परवाना न देणेबाबत निवेदन दिले. माजी मंत्री
आमदार अमित विलासराव देशमुख यांनी महावितरणच्या वीज कर्मचारी अधिकारी अभियंता संघर्ष समिती शिष्टमंडळाला याबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही दिली. यावेळी यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटनेचे सरचिटणीस संजय खाडे, महावितरणचे कनिष्ठ अभियंता विष्णू अघाव, कनिष्ठ अभियंता ए.एन.दायमे, दासराव बिडगर, एकनाथ जाधव, सुनील कुकर, जीबी भाडुळे,
राहुल भंडारी, सुदर्शन बोळेगावे, राम वाडकर, सचिन गुरव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *