• Tue. Apr 29th, 2025

नामनिर्देशपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी…

Byjantaadmin

Oct 17, 2024

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक

नामनिर्देशपत्र दाखल करण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी मार्गदर्शक सूचना जारी

लातूर, दि.17 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजी घोषित करण्यात आला आहे. या दिवसापासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.  

निवडणूकीच्या कालावधीत लातूर जिल्ह्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस वाहनांच्या ताफ्यामध्ये तीनपेक्षा जास्त मोटारगाड्या वाहने यांचा ताफ्यात समावेश नसावा. तसेच उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालयाचे 100 मीटरच्या परिसरात तसेच दालनात पाच व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशनपत्र दाखल करते वेळेस कार्यालयाच्या परिसरात मिरवणूक सभा घेणे, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणे, वाद्य वाजविणे किंवा गाणी म्हणने आणि कोणत्याही प्रकारचा निवडणूक प्रचार करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. हे आदेश दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीपासून दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 रोजीपर्यंत संपूर्ण लातूर जिल्ह्यात लागू राहतील , असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

***  

वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा अधिक वाहनांवर निर्बंध

लातूर, दि.17 (जिमाका) :  भारत निवडणूक आयोगाने 15 ऑक्टोबर, 2024 रोजी विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात आदर्श आचार संहिता लागू झाली आहे. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार कोणत्याही परिस्थितीत सुरक्षेसाठी असलेल्या मोटारगाड्या, वाहने यांच्या ताफ्यात दहापेक्षा अधिक वाहने नसावीत, असे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये कोणत्याही वाहनाच्या ताफ्यामध्ये दहापेक्षा जास्त मोटारगाड्या अथवा वाहने (कार, व्हेईकल) वापरण्यास निर्बंध घालण्यातचे आदेश निर्गमित केले आहेत. हे आदेश दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीपासून दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 रोजीपर्यंत संपूर्ण लातूर जिल्ह्यात अंमलात राहणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहेत.

****

सार्वजनिक इमारतींच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, रहदारीस अडथळा निर्माण न होवू देण्यासाठी निर्बंध

लातूर, दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीचे आदेशाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूक -2024 या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून, कार्यक्रम घोषीत केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचार संहिता अंमलात आल्याने लातूर जिल्ह्यातील लोकसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून राजकीय पक्षांनी, निवडणूक लढविणाऱ्या उमेदवरांनी किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी किंवा त्यांच्या हितचिंतकाने सार्वजनिक इमारतीच्या ठिकाणी, सार्वजनिक रस्त्यावर, निवडणूकीच्यासंबंधी पोस्टर्स, बॅनर्स, पॉम्प्लेट्स, कटआऊटस, होर्डींग्ज, कमानी लावणे या व इतर बाबींमुळे रहदारीस अडथळा निर्माण होवू शकेल. तसेच त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे त्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. सर्व संबंधितांस नोटीस देवून त्यांचे म्हणने एकुण घेणे शक्य नसल्याने एकतर्फी आदेश काढण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) अन्वये निवडणूकीचे सर्व साहित्य कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी, रस्त्यावर रसहदारीस अडथळा होईल किंवा अपघात होईल अशा पध्दतीने लावण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे निर्बंध घालण्यात येत आहेत.

खाजगी व्यक्तीच्या जागेवर, सार्वजनिक जागेवर झेंडे, भितीपत्रके लावण्यास निर्बंध

लातूर, दि.17 (जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केला असून , जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाला आहे. जिल्ह्यातील विधानसभा निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया शांततेत, निर्भय व न्याय वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे यांनी भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये आदेश निर्गमित केले आहेत. त्यानुसार निवडणूकीच्या प्रचारासाठी कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीगत जागा, इमारत, आवार, भिंत आदी ठिकाणांच्या संबंधित जागा मालकाच्या परवानगीशिवाय व संबंधित परवाना देणाऱ्या प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय प्रचारासाठी वापर करण्यास निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. हे आदेश दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीपासून दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 रोजीपर्यंत संपूर्ण लातूर जिल्ह्यात अंमलात राहतील , असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

ॲटोरिक्षा,टेम्पो,सायक,सायकल रिक्षा व इतर वाहनांवर पक्षांचे बोधचिन्ह, झेंडे व इतर घोषवाक्यास प्रतिबंध

लातूर, दि. 17 : भारत निवडणूक आयोगाने दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 रोजीचे आदेशाने सार्वत्रिक विधानसभा निवडणूक -2024 या निवडणूकीचा कार्यक्रम घोषित केलेला आहे. तसेच दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 ते निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दिनांकापर्यंत भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहीता लागू केली आहे.लातूर जिल्ह्यात भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय ॲटोरिक्षा, टेम्पो, सायकल रिक्षा, सायकल व इतर वाहनांवर पक्षाचे बोधचिन्ह / झेंडे व इतर घोषवाक्य लिहीणे इत्यादीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. हे आदेश दिनांक 15 ऑक्टोबर, 2024 पासून ते दिनांक 25 नोव्हेंबर, 2024 पर्यंत अंमलात राहतील.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed