आद्य कवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी
निलंगा : निलंगा तालुक्यातील कोकळगाव येथील द्रोणाचार्य क्लासेस मध्ये आद्य कवी महर्षी वाल्मिकी जयंती मोठ्या भक्तिभावाने साजरी करण्यात आली. महर्षी वाल्मिकी हे महान हिंदू महाकाव्य शास्त्र रामायणाचे प्रसिद्ध लेखक आहेत आणि ते संस्कृत साहित्याचे पहिले कवी देखील आहेत. प्रथमतः महर्षी वाल्मिक ऋषीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी क्लासेसचे संचालक द्रोणाचार्य कोळी म्हणाले की, वाल्मिकी जयंती साजरी ही एका महान संताला श्रद्धांजली आहे ज्यांनी आपल्या शिकवणीतून सामाजिक न्यायासाठी लढण्यासाठी लोकांना प्रेरित केले. त्यांनी प्रभू रामाच्या मूल्यांचा प्रचार केला आणि त्यांना तपश्चर्या आणि परोपकारी पुरुष म्हणून मान्यता दिली.
यावेळी शिवकन्या लोहार, रोहिणी वागांना, वैष्णवी वागांना, स्वाती बनसोडे, ओमकार आगलावे आदीं विद्यार्थ्यानी महर्षी वाल्मिकि यांच्या जीवकार्यावर भाषणे सादर केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजली विठूबोने यांनी केले.
